Chitra Wagh | पुण्यात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल; म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune) माणुसकीला काळिमा लावणारा प्रकार घडला आहे. 12 वीचे गुण वाढवून देतो असं सांगत एका शिक्षकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची ( sexual harassment) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यांनतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला (State Government) सवाल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

‘राज्यातली विकृती टोकाला गेल्याचं दिसतंय, पुण्यात शिक्षकाने गुण वाढवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत किळसवाणा, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार घडलाय. सध्या अशा प्रकारांची मालिकाच राज्यात घडतेय की काय असा प्रश्न मला पडतोय. ठाण्यात पालिकेचा आरोग्य उपायुक्त विश्वनाथ केळकर याने एका नर्सकडे अशी मागणी केली. साताऱ्यात गटशिक्षण अधिकाऱ्याने शिक्षिकेकडे अशी मागणी केली. बीडमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या महिलेकडे अशी मागणी केली. बीडच्या दिनरूडमध्ये शेतकरी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. तिने विरोध केल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण झाली आणि पोलिसांनी त्या कुटुंबावरच गुन्हा दाखल केला, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

Chitra Wagh | slams maharashtra government on pune teacher sexual harassment case

पुढे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, ‘विकृती वाढत चालली आहे. सरकारचं तिकडे लक्ष नाही. एकमेकांना सांभाळून घेण्यात ते व्यस्त आहेत. मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की तुमचं जर भांडण आणि सगळे देखावे संपले असतील तर आपण महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर लक्ष देणार आहात का? रोज अशी विकृती वाढते आहे. यावर काही नियंत्रण आणणार आहात का?’, असा थेट सवाल चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तर राज्यात मागील काही दिवसांत घडलेल्या या घटनांचा संदर्भ देऊन चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सरकारला सवाल केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (vishrambaug Police Station) हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12 वीच्या परीक्षेत तुला
गुण वाढवून देतो, असं सांगून अभिजित पवार (Abhijit Pawar) हा सदर मुलीकडे शरीरसुखाची
मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी
त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. परंतु, नकार देऊनही प्रकार सुरूच राहिल्यामुळे शेवटी त्या
विद्यार्थिनीने त्या शिक्षकाने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच
नातेवाईकांना ऐकवला. तसेच, हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी आणि अन्य नागरिकांनी
शिक्षकाला जाब विचारण्यासाठी थेट कॉलेजमध्ये धाव घेतली. यावेळी विद्यार्थिनीही सोबत होती.
यावेळी शिक्षक अभिजित पवारला (Abhijit Pawar) सर्वानी रंगेहाथ पकडून त्याची चांगलीच
धुलाई केली आहे.

हे देखील वाचा

Jalgaon Bhusawal Train | भुसावळ विभागातील वाहतूक दोन दिवस बंद असल्यानं तब्बल 36 रेल्वे गाडया रद्द

Anti Corruption | काय सांगता ! होय, तब्बल 22 लाखांची लाच घेतलेला पोलीस निरीक्षक पुन्हा सेवेत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chitra Wagh | slams maharashtra government on pune teacher sexual harassment case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update