Chitra Wagh | उर्फी जावेद प्रकरणावर चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उर्फी जावेदच्या कपड्यांविरोधात भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यात वाद सुरू आहे. उर्फी जावेद यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेला हा नंगा नाच थांबविण्यात यावा अशी मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेवर राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना एक नोटीस जारी केली. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करावी अशी मागणी केली. त्यावर आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, देवेंद्र फडणीस यांना मी विनंती करते की उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीकडून आम्ही देखील पुढाकार घेऊ. महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करत नाहीयेत. जशी त्यांच्या घरात एक मुलगी आहे, तशीच त्यांच्याही घरात एक मुलगी आहे. अनेक महिलांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे आपले काम नाही. महिला आयोग त्यांच्या नियमांप्रमाणे काम करेल. त्याविषयी चर्चा कशाला करायची.’ असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले होते. (Chitra Wagh)

 

त्यावर बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर अतिशय कठोर शब्दात टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत, अशा शब्दांत टीका केली आहे. सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी महिला आयोगावर ज्यांची नेमणूक केली आहे, त्या बाष्कळ विधाने करत आहेत. अगोदर त्यांना सांगा. असे देखील चित्रा वाघ यावेळी बोलताना म्हणाल्या.

तसेच याबाबत पुढे बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, सुप्रिया यांनी एक लक्षात घ्यावे की आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना गूळ खोबरे देऊन आमंत्रण दिले नव्हते.
त्याचप्रमाणे मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेला नंगानाच सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. त्यांनी महिला आयोगच्या अध्यक्ष असलेल्यांना सल्ले दिले पाहिजेत.
आमचा आक्षेप महिला आयोगाला नाही. महिला आयोगाच्या चुकीच्या कार्यपद्धतीला आमचा आक्षेप आहे.
असा टोला त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर यांना लगावला.
आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपध्दतीवर त्यांनी एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

Web Title :- Chitra Wagh | supriya sule chitra wagh criticize each other on urfi javed dress clash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक