मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Mumbai Tour) आले होते. मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी निशाणा साधताना खोचक टोला लगावला होता. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी पोलीसनामाच्या (www.Policename.com) बातमीचे ट्विट करुन सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. ‘अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आली आहे’, अशा शब्दांत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने आम्ही त्यांचे स्वागतच करतो. या भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण आडवाणी (LK Advani), अरुण जेटली (Arun Jaitley), यशवंत सिन्हा (Yashwant Sinha), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहे. मात्र आज यांसारखे नेते भाजपकडे नाहीत. हे पाहून सर्वात वाईट वाटत आहे. बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते की, सरपंच पदाच्या निवडणुकीपासून (Sarpanch Election) देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतता. तसेच प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदींशिवाय भाजपकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला खोचक टोला लगावला होता.
अहो @supriya_sule ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आलीये 😂
बाकी मा. @narendramodi जी यांची काळजी घेण्यास 130 करोड भारतीय सक्षम आहेत
भाजपा हे एक कुटुंब असल्याने कोणत्याही कामापूर्वी, कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली भारतीय संस्कृती! pic.twitter.com/9hS8J50OyH
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 19, 2023
चित्रा वाघ यांचा पलटवार
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी खोचक ट्विट करुन पलटवार केला आहे. ‘अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आली आहे. बाकी मा. नरेंद्र मोदीजी यांची काळजी घेण्यास 130 कोटी भारतीय सक्षम आहेत. भाजप हे कुटुंब असल्याने कोणत्याही कामापूर्वी, कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली भारतीय संस्कृती!’ असं खोचक ट्विट करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Web Title :- Chitra Wagh | supriya sule vs chitra wagh take care of the party chitra waghs reply to supriya sule
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- MLA Rohit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांची बोचरी टीका; म्हणाले…
- Marathwada Teacher Constituency | मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना मोठा धक्का; विश्वासू सहकारी भाजपच्या गोटात
- Maharashtra Politics | PM नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप-शिंदे गटाची संयुक्त बैठक