Chitra Wagh | महिला अत्याचाराचे समर्थन करणारे ठाकरे सरकार; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे सरकार (Thackeray Government) अत्यंत अहंकारी, खुनशी व मुख्यत: महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व वेळ प्रसंगी त्यांचे समर्थन करणारे हे विकृत सरकार आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाने (Pune Cantonment Constituency) आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh) बोलत होत्या.

 

यावेळी कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), माजी मंत्री दिलीप कांबळे (Former Minister Dilip Kamble), माजी आमदार जगदिश मुळीक (Jagdish Mulik), पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील (Corporator Archana Tushar Patil), प्रीती सुनिल कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, शहर चिटणीस कोमल शेंडकर, माधुरी गिरमकर, सुवर्णा भरेकर, उज्वला गौड, महिला मोर्चाच्या अध्यक्षा दिप्ती पाटोळे, महेश पुंडें अध्यक्ष कँटोनमेंट मतदारसंघ, धनराज घोगरे (Dhanraj Ghogre), उमेश गायकवाड (Umesh Gaikwad), दिलीप गिरमकर (Dilip Giramkar), सचिन मथुरावाला उपाध्यक्ष पुणे कँटोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment Board), कालिंदा पुंडे, मनिषा लडकत, मंगला मंत्री, प्रियांका श्रीगिरी, लक्ष्मी घोडके, सुधिर जानजोत, नगरसेवक सर्व आघाडीचे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या मेळाव्यात महिला अत्याचाराची विविध उदाहरणे प्रस्तुत करत ठाकरे सरकार हे महिलांना असुरक्षित करत आहे असे प्रतिपादन चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. शिवसेना नेत्यावर (Shivsena Leader) बलात्काराचा (Rape In Pune) आरोप होऊनही संपूर्ण पोलिस खाते (Police Department) त्याच्या समर्थनार्थ काम करत आहे. तसेच वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील शाळेत मुलीवर झालेल्या चाकू हल्ल्यात शाळेची कोणतीच जबाबदारी नाही का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याच वेळेस सरकारची आरती ओवाळणाऱ्या पोलीस खात्यात अनेक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यामागे समाजाने व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय सुषमा स्वराज (Late Sushma Swaraj) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना विशेष पुरस्काराने (Special Award) सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना आमदार सुनील कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी ही सामान्य माणसाची आणि कार्यकर्त्यांची पार्टी आहे.
तिची ओळख कोणी एका नेत्याच्या नावामुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे होते.
त्यामुळेच कार्यकर्त्यांनी महिला सक्षमीकरणाला आपल्या घरातून सुरुवात करावी असे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिलांनी करून तळागाळातल्या महिलांपासून उच्चशिक्षित महिलांना या मेळाव्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक उपस्थित केले आहे.
त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन आमदार सुनील कांबळे यांनी केले.

यावेळी दलित इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (Dalit Industrial Chamber of Commerce and Industries)
महिला आघाडीच्या प्रमुख महिला उद्योजक निर्माण होण्यासाठी कार्यरत असलेल्या सीमा कांबळे (Seema Kamble) यांनीही मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारधारेनेच चालत असून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे परंपरा या पक्षात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महिला आरक्षण (Women’s Reservation) नसताना भारतीय जनता पार्टीमध्ये विजयाराजे सिंधिया (Vijayaraje Scindia),
सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan), उमा भारती (Uma Bharti) इत्यादी महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे,
याचे स्मरण त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमात कर्तृत्ववान भारतीय महिलांना वैशिष्ट्यपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या या मेळाव्यास हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांसाठी केलेल्या योजनांची माहिती व त्याचा लाभ कसा घ्यायचा याबाबतही प्रदर्शनी लावण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये छोट्या आनंदी बोराडेने सादर केलेला जिजाऊंच्या कथेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेश वंदनेने आरंभ झालेल्या या कार्यक्रमात सर्व महिला अत्यंत उत्साहाने वावरत होत्या.

या महिला मेळाव्याच्या निमित्ताने डॉ. उषा तपासे (सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय), मिनल विक्रम रुपारेल (समाजसेविका),
तेजा कांबळे (महिला बचतगट संघटक), वंदना विलास दवे (लघु उद्योजिका), अंबिका मांगीलाल शर्मा (जेष्ठ समाजसेविका),
वंदना पराडकर (प्राणी मित्र), डॉ. इरेन जुडा (आर्मी डॉक्टर), डॉ. दिप्ती भास्कर बच्छाव, मनिषा शिंदे, कोमल एकनाथ शिंदे (राष्ट्रीय खेळाडू) अन्य महिलांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल त्यांना सुषमा स्वराज पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Web Title :- Chitra Wagh | Thackeray government supporting women’s atrocities Criticism of BJP leader Chitra Wagh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा