Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका मुजोर आणि मद्याच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) सकाळी 7 च्या सुमारास एका शाळकरी मुलीला ठाण्यात (Thane) रिक्षामागे फरफटत नेल्याची घटना घडली होती. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिसांनी (Thane Police) रिक्षाचालकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल करत त्याचा शोध घेऊन त्याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्याची धडगत नाही असा इशारा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला आहे.

 

काय आहे प्रकार?
शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थीनी बाजारपेठेतून पायी जात असताना, रिक्षाचालकाने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीने त्याला याचा जाब विचारल्यानंतर त्यांने तिला जबरदस्ती रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. याला त्या मुलीने विरोध केला असता, त्याने तिचा हात धरुन चालू रिक्षातून तिला फरफटत नेले. यात मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून या मुजोर रिक्षावाल्याचा शोध घेतला. हा रिक्षावाला दिवा (Diva, Thane) भागात राहतो. त्याचे नाव काटिकादाला उर्फ राजू आब्बायी विरांगनेलू आहे. हा रिक्षाचालक मुळचा आंध्रप्रदेशचा आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता हा प्रकार घडला.

 

ही विद्यार्थीनी सकाळी बाजारपेठ भागातून जात असताना, रिक्षावाल्याने तिला पाहून अश्लिल हावाभाव केले.
यानंतर तरुणीने त्याला जाब विचारला, असता त्याने तिला रिक्षात कोंबण्याचा प्रयत्न केला.
त्याला तरुणीने विरोध केला असता, तिला त्याने रिक्षा सुरु करत फरफटत नेले. यावेळी तरुणीने त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला.
यात तरुणीच्या हाताला दुखापत होऊन ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने धूम ठोकली.
पोलिसांत तक्रार झाल्यानंतर 24 तासांत सीसीटिव्हीच्या मदतीने गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुजोर रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. तसेच राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे.
आणि त्यांच्या सरकारमध्ये कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्याची धडगत नाही,
असे वाघ म्हणाल्या.

 

Web Title :- Chitra Wagh | thane rickshawala arrested confession of taking girl away from rickshaw under influence of alcohol investigation by police begins

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन

Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ