Chitra Wagh To Ajit Pawar | चित्र वाघ यांचा अजित पवारांना सवाल; म्हणाल्या – ‘दादा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh To Ajit Pawar | मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत (Azaan Loudspeakers) कार्यकर्त्यांना आदेश दिला होता. यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाच आदेश शिवसेना (Shivsena) आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना (Party Chief) लागू होतो, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे. (Chitra Wagh To Ajit Pawar)

 

काय म्हणाले अजित पवार?

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात भोंग्यावरुन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी तसे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरुन अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील. यांना घरात बसून बोलायला काय जाते? असं अजित पवार म्हणाले होते. आता त्याच वक्तव्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना सवाल केला आहे.

 

 

 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी एक पोस्टर ट्विट करुन अजित पवारांना सवाल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील हाच नियम राणा दाम्पत्याच्या (Rana Couple) घरासमोर आंदोलन (Agitation) करणाऱ्या शिवसैनिक आणि त्यांच्या प्रक्षप्रमुखांनाही लागू होतो ना दादा..? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

 

Web Title :- BJP leader chitra wagh asked ajit pawar to take action against shivsena party worker in rana couple case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा