‘सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे’ म्हणणाऱ्या चित्रा वाघ ‘राष्ट्रवादी’ तसेच नेटीझन्सकडूनही ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोस्ट टाकत भाजपाचा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय अभिमानास्पद असल्याचे म्हंटले आहे. यावरून चित्रा वाघ यांना ट्रोल राष्ट्रवादीकडून तसेच नेटीझन्सकडूनही ट्रोल करण्यात आलं आहे.

भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शनिवारी रात्री राज्यपालांनी आमंत्रण दिल्यानंतर रविवारी भाजपाने शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही याविषयीच ट्विट महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले हेच. ट्विट रीट्विट करत चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे… अभिमानास्पद निर्णय !,’ असं ट्विट वाघ यांनी केलं होतं. मात्र याच ट्विटवरुन राष्ट्रवादीने चित्रा वाघ यांना सुनावले आहे.

ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागली आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वाघ यांना विचारला आहे. याशिवाय वाघ तुम्हाला तत्व आणि निष्ठा ही भाषा शोभत नसल्याचे नेटीझन्सनी म्हटले आहे.

देर आये…दुरूस्त आये. ज्या पक्षाने मान, सन्मान, पद,प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना…

Geplaatst door Rupali Chakankar op Zondag 10 november 2019

 

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like