Pune News : पूजा चव्हाणनं उडी घेतलेल्या वानवडी परिसरातील इमारतीत भाजप नेत्या चित्रा वाघ, केली पाहणी अन् म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात भाजप आक्रमक भूमिका घेतली असून, आज भाजपच्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली, त्या इमारतीची पाहणी केली आणि त्यानंतर थेट वानवडी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर संशय व्यक्त करत येथे गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी तक्रार नसल्याचे सांगितल्यानंतर मात्र त्या प्रचंड चिडल्या. त्यांनी पुणे पोलिसांकडून तपास काढत तो एका सक्षम अधिकाऱ्याला द्यावा, अशी मागणी केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीतील पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुणे पोलिसांनी याप्रकरणी ईडी दाखल केली गेली. पण यात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. यानंतर भाजपने आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण, तपास सुरू करत सर्वांचे जबाब घेतले आहेत. त्यात आईवडील व इतरांनी कोनाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुणे पोलीस अजून देखील सर्वांकडे चौकशी करत आहे.

मात्र आता पंधरा दिवस उलटून देखील पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने भाजपने आक्रमक भमिक घेत आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज घटनास्थळी दाखल होत येथील पाहणी केली. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत थेट वानवडी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. चित्रा वाघ थेट पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये जात पीआय लगड यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर तपास काय केला याबाबत विचारण्यास सुरुवात केली. पण याबाबत तक्रार नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र चित्रा वाघ यांनी चांगलाच राडा घातला. त्यांनी तेथून थेट माध्यमांना पुणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे. पहिल्यापासून वानवडी पोलीस तपास करत नसून पुणे पोलिसांकडून तपास काढून तो एकाद्या सक्षम अश्या अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या…
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. ही घटना कशी घडली असेल ते पाहण्यासाठी आज मी या ठिकाणी आले होते. संपूर्ण इमारतीची पाहणी केली. इमारतीवर जाण्यासाठी रस्ता कुठून आहे ? ग्रील आहे का ? ही घटना कशी घडली असेल ? किती उंचीवरून पूजा पडली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पूजा राहात होती, तो फ्लॅट पोलिसांनी सील केलाय. परंतु त्याच फ्लॅटच्यावर असणाऱ्या दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये जाऊन चित्रा वाघ यांनी या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. इमारतीला टेरेस नाही, पूजा राहत असलेल्या फ्लॅटमध्ये बाल्कनीला कठडा आहे. पूजाची हाईट किती होती हे मला माहीत नाही, परंतु वर चढायच असेल, उडी मारायची असेल तर त्या कठड्यावर जावंच लागतं. त्यामुळे ती स्वतःवर गेली होती की तिला कोणी ढकलून दिलं ते पोलिसांनी सांगितलं पाहिजे.

दरम्यान चित्रा वाघ यांनी पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. तर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील भेट घेत आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी विचारणा करणार असल्याचे सांगितले आहे.