Chitra Wagh | ‘…तर मग राठोडांना क्लिन चीट का दिली?’ चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले संजय राठोड यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्यानंतर सरकारने त्यांचा राजीनामा घेतला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याकडून करण्यात येत होती. तेव्हापासून सुरू झालेला चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि संजय राठोड यांचा संघर्ष काही संपताना दिसत नाही. आज पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना संजय राठोड यांच्याविषयी प्रश्न विचारला असता. त्यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, ‘ ज्यावेळी रस्त्यावरील लढाईची गरज होती. त्यावेळी संजय राठोड यांच्या विरोधात मी लढले. आता या प्रकरणी न्यायालयात मी गेली आहे. न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही, ते तुम्ही कधीही तपासू शकता. दुसरी गोष्ट त्यांना मंत्री करत असताना माझी जी भूमिका आहे, ती मी मांडलेली आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही मी बोलले आणि आजही बोलते आहे. तिसरी गोष्ट त्यांना मंत्रीपद यासाठी दिलं, कारण त्यांना क्लिनचीट दिली आहे. आता क्लीनचिट कोणी दिली? आमचं सरकार तर आता आलं आहे.’ अस म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना साधला.

यावर पुढे बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, ‘जे प्रश्न तुम्ही मला विचारत आहात ते तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायला हवे आहेत. तसेच त्यावेळचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारायला हवेत. आणि पुण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारायला हवेत, ते आजही सेवेत आहेत. की बाबांनो तुम्ही संजय राठोड यांना क्लिनचीट का दिली? तुम्ही क्लिनचीट दिली म्हणून सरकारने त्यांना मंत्री बनवलं. पण तरीही माझा विरोध त्यांना कायम आहे.’ असेही यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या.

‘ज्यावेळी रस्त्यावर उतरून लढाई लढायची होती त्यावेळी ती लढले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
आणि माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.’ असे देखील चित्रा वाघ यावेळी बोलताना म्हणाल्या.

तसेच, यावर पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, यांना निर्दोषत्व देण्यात महाविकास आघाडीच जबाबदार आहे.
आणि अशा प्रवृत्तींविरूध्द माझा लढा असाच सुरू राहणार असल्याचे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह केला.
आजही करत असून उद्याही करीत राहणार आहे.
या प्रकरणातील पिडीतेला न्याय मिळावा यासाठी आपणच पुढाकार घेऊन जनहित याचिका न्यायालयात दाखल
केली आहे. राठोड यांना या प्रकरणात क्लिन चीट देण्यामागे तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि
पुण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा समावेश आहे.
ही बाजू न्यायालयात स्पष्ट होईलचं.’ असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

Web Title :-Chitra Wagh | why did sanjay rathore get a clean chit ask uddhav thackeray this chitra wagh statement in the press conference

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uorfi Javed | ‘उर्फी जिथे दिसेल तिथे तिचं तोंड फोडेनं’ ! चित्रा वाघ यांच्या धमकीनंतर उर्फीची महिला आयोगाकडे धाव

Pune Crime News | आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR