…म्हणून मी भाजपात प्रवेश केला : चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले कि, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी पक्ष सोडला. ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी मी आवाज उठवला. त्याचबरोबर या सरकारच्या विरोधात मी अनेक वेळा आवाज उठवला. अनेक ठिकाणी माझ्यावर यासाठी गुन्हे दाखल आहेत. भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने मी या पक्षात प्रवेश केला असून या पक्षात राहून मला अजून लोकांच्या समस्या सोडविता येतील. त्याचबरोबर पतीच्या चौकशीचा आणि माझा भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मी गद्दार नसून सर्वांच्या देखत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी पवारांनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या कि, शरद पवार यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत.

यापूर्वी शरद पवार यांनी आरोप केले होते कि, राज्य सरकार सर्व आमदारांना ईडी, सीबीआय यांची धमकी दाखवून पक्षात येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर चित्र वाघ यांच्याविषयी बोलताना देखील पवार म्हणाले होते कि, पतीच्या बचावासाठी त्या पक्ष सोडत असून त्यांनी माझी भेट घेऊन मला हे सांगितल्याचे देखील पवार म्हणाले होते.

दरम्यान, या चार आमदारांच्या प्रवेशानंतर आता आणखी किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर चित्रा वाघ यांच्या या आरोपांवर शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त