अभिनेत्री चित्रांगदा सिंगने घेतली राहुल द्रविडची ‘फिरकी’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी ती भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडमुळ चर्चेत आहे. तिने राहुलला इंद्रानगरच्या गुंडा शांत हो असे म्हणत त्याची फिरकी घेतली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

राहुल द्रविड हा क्रिकेटमधला सगळ्यात संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. मैदानामध्ये राहुलला राग अनावर झाल्याच आपण कधीच पाहिलेल नाही. पण आयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुलचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून येत आहे. इंदिरानगर का गुंडा हूं मै असे म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे. या जाहिरातीचे निमित्त साधत चित्रांगदाने त्याची फिरकी घेतली आहे. राहुलचा हा व्हिडीओ पाहून विराट कोहली देखील थक्क झाला आहे. राहुलच हे रूप क्रिकेट रसिकही पहिल्यांदाच बघत आहेत. द्रविड हा सध्या बंगळूरुमध्ये एनसीएचा प्रमुख आहे. टीम इंडियाच्या नवोदितांना घडवण्याचे काम तो करत आहे. त्याचे अनेक शिष्य आता यावेळची आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.