Chitrashi Rawat | ‘चक दे इंडिया’ फेम चित्राशी रावतनी 11 वर्षे डेटींगनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री चित्राशी रावत (Chitrashi Rawat) आजही तिची भूमिका कोमल चौटेलामुळे सर्वत्र ओळखली जाते. चित्राशीने मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘चक दे इंडिया’ यातून तिला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती. आजही प्रेक्षक तिला कोमल या नावानेच ओळखतात. आता लवकरच कोमल (Chitrashi Rawat) लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून चित्राशीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. चित्राशी आजवर अनेक चित्रपटात झळकून आली, मात्र सर्वात जास्त प्रसिद्धी तिला चक दे इंडिया या चित्रपटातून मिळाली होती. त्यानंतर ती सर्वत्र ओळखली जाऊ लागली. आता चित्राशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 11 वर्ष अभिनेता ध्रुवादित्य भागवनानी सोबत डेट करत असल्यामुळे चर्चेत होती. आता अकरा वर्षांनी हे दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. हे दोघे अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमात एकत्रित दिसून आले होते. यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता चित्राशी (Chitrashi Rawat) लवकरच आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.
अनेक माध्यमातून तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर अभिनेता ध्रुवादित्य देखील अनेक चित्रपटात झळकून आला होता. आता हे दोघे 4 फेब्रुवारीला छत्तीसगडमधील विलासपुर मध्ये लग्न गाठ बांधणार आहेत. त्याआधी अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. चित्राशी आणि ध्रुवादित्यच्या या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या दोघांची लव स्टोरी प्रेमाई या चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि आता तब्बल 11 वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या बातमीने चित्राशी आणि ध्रुवादित्यच्या चाहत्यांना फारच आनंद झाल्याचे दिसत आहे. दोघांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Web Title :- Chitrashi Rawat | shahrukh khan movie chak de india fame komal aka chitrashi rawat wedding updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Aurangabad ACB Trap | प्रशिक्षणातून सवलत देण्यासाठी लाचेची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात