चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला होतात ‘हे’ फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेकजण चॉकलेट आवडीने खातात. केक सुद्धा चॉकलेटचाच खाणे पसंत करतात. लहान मुलांनाही चॉकलेट केक जास्त आवडतो. चॉकलेट खाण्यामुळे आरोग्यासही अनेक फायदे होतात. चॉकलेटमध्ये पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी असते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक उपयोगी आहे.

चॉकलेट केकमध्ये असणारा सुका मेवा जसे बदाम, फळे हे तणाव दूर करण्यास मदत करतात. पुरेशा प्रमाणात खाल्ल्यास मूड चांगला राहतो. फ्रूट केकमधील कार्बोहायड्रेट्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे सतत भूक लागत नाही. चॉकलेटमुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. योग्य प्रमाणात चॉकलेट केक खाण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेहापासून बचाव होतो, असे म्हटले जाते. चॉकलेट अथवा चॉकलेट केक प्रमाणातच खावे, अन्यथा लठ्ठपणा वाढू शकतो. यामध्ये बटरचे प्रमाणही कमी असायला हवे.