ट्विटरवर वायरल झाली नूडल्सची अशी रेसिपी की, लोक म्हणाले – ‘हा गुन्हा आहे, गुन्हा !’

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमी काही खास रेसिपी वायरल होत असतात. कोरोना लॉकडाऊन दरम्यान लोकांनी डालगोना कॉफी ट्राय केली. या कॉफीनंतर पॅनकेकसह अनेक रेसिपी वायरल झाल्या, परंतु सध्या सोशल मीडियावर एक अशी रेसिपी ट्रेंड करत आहे, जी पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. ही रेसिपी ऐकल्यानंतर तुमच्याही तोंडातून केवळ शी…शी…शी…ऐकायला मिळू शकते. ही रेसिपी आहे चॉकलेट मॅगीची.

होय, बरोबर वाचलंत तुम्ही, आपली ती मॅगी चॉकलेट सोबत. ही रेसिपी बनवणे तर दूरच लोक बघूनच अजब रिअ‍ॅक्शन देत आहेत. चॉकलेट मॅगी पाहिल्यानंतर ट्विटर यूजर्स भडकले आहेत आणि त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. काही यूजर तर असे आहेत, ज्यांनी आपला राग व्यक्त करत म्हटले – प्लीज असं करू नका.

सोशल मीडियावर लोक हा फोटो वायरल करत आहेत. आणि सोबतच कमेंट लिहित आहेत की, दोन स्वादिष्ट वस्तू एकत्र मिसळण्याची गरज नाही. पाहुयात सोशल मीडिया यूजर्सने चॉकलेट मॅगी पाहून कशा रिअ‍ॅक्शन दिल्या…

श्रीकांत नावाच्या यूजरने एक फोटो शेयर करत म्हटले की हा गुन्हा आहे.

शेल्डनचे म्हणणे आहे की, हे काय पाहिलं…

मुदित जैन म्हणाला की, हे पाहिल्यानंतर तर भिती वाटू लागलीय.

एक यूजरने ही रेसिपी बघितल्यानंतर म्हटले…तौबा-तौबा और बस तौबा

याशिवाय काही यूजर्स विचारत आहेत की, कुणी हिम्मत कशी झाली अशी रेसिपी बनवण्याची. जाऊद्या लोकांचा मूड आणि टेस्ट आहे, ते काहीही ट्राय करू शकतात. तर तुम्ही काय विचार केला आहे या रेसिपीबाबत?