पिंपरी : चॉकलेटच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे ५ वर्षाच्या मुलीवर ‘कुकर्म’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – किराणा मालच्या दुकानात ५ वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बोलावून तिच्याशी कुकर्म करण्याचा प्रकार नेहरुनगर येथे घडला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी भाऊराव ऊर्फ आप्पा बळीराम खरात (वय ६७, रा. नेहरुनगर) याला अटक केली आहे. ही घटना ६ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता नेहरुननगरमध्ये घडली आहे.

याप्रकरणी एका ५३ वर्षाच्या व्यक्तीने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भाऊराव खरात यांचे नेहरुनगर किराणा दुकान आहे. खरात याने फिर्यादीच्या पाच वर्षाच्या नातीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या अवघड जागी चाळे करुन तिच्याशी कुकर्म केले. पिंपरी पोलिसांनी खरात याच्याविरुद्ध पोस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com

You might also like