अट्टल गुन्हेगार चॉकलेट सुन्याला कोल्हापूरमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जनता वसाहत वर्चस्ववादातून निलेश वाडकर याचा खुन करुन फरार झालेला व तब्बल २९ गुन्हे असलेल्या चॉकलेट सुन्या ऊर्फ सुनिल किशोर डोकेफोडे (वय २२) याला पकडण्यात सहा महिन्यानंतर गुन्हे शाखेला यश आले आहे. चॉकलेट सुन्या, त्याची मैत्रिण आणि पत्नी यांना काल रात्री कोल्हापूर येथील बसस्थानकावरुन ताब्यात घेतले असून त्याला आज सकाळी पुण्यात आणण्यात आले आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून चॉकलेट सुन्या हा पोलिसांना हुलकाविण्यात देत होता. गुन्हे शाखेची तीन पथके त्याचा विविध ठिकाणी शोध घेत होते. तो गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यावर दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे पथक त्याचा शोध घेत होती. त्यानंतर तो गोव्याहून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोव्यातून येताना वाटेत सर्वत्र बस चेक करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर येथे तो एका बसमध्ये पत्नी व मैत्रिणीसह पोलिसांच्या हाती लागला असून त्याला पुण्यात आणण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

पर्वती येथील जनता वसाहतीत गुंड निलेश वाडकर व चॉकलेट सुन्या यांच्या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून नेहमीच संघर्ष सुरु असायचा. त्यातूनच चॉकलेट सुन्याच्या टोळीने जानेवारी २०१९ मध्ये नीलेश वाडकर याच्यावर वार करुन त्याचा निर्घुण खुन केला होता. तसेच त्याचे साथीदार अमोल कदम, गणेश जाधव आणि सुजित बडंबे यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चॉकलेट सुन्यासह आरोपींविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर चॉकलेट सुन्या हा फरार झाला होता.

या टोळीयुद्धामुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यामुळे शहर गुन्हे शाखेने चॉकलेट सुन्याच्या टोळीचा पिच्छा पुरवून त्याच्या १९ गुंडांना गजाआड केले होते. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चॉकलेट ऊर्फ सुनील डोकेफोडे, नवनाथ बाळासाहेब वाल्हेकर, योगेश राजेंद्र जांभळे, अभिजित गणेश कडू, नितीन ऊर्फ मेट्या अंकुश मेटकरी, अतिश सतीश माळी, प्रकाश ऊर्फ पप्पू अरुण गायकवाड, सौरव रावसाहेब आढाव, राजेश रावसाहेब आढाव, अक्षय हरिभाऊ आंबवले, सूरज ऊर्फ सुरज्या बबन कोळगे, अभिजित राम कदम, भीमराज राजू कांबळे, समीर राऊत नाटेकर, अविनाश ऊर्फ गौरव सुनील देवकुळे, शुभम एकनाथ खाडे, सतीश श्याम माळी, योगेश ऊर्फ नुन्या शशिकांत पवार आणि दीपक शेंडी ऊर्फ दीपक दत्तात्रय खिरीड अशी मोक्का लावलेल्या आरोपींची नावे आहेत.

२०१६ मध्ये गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने चॉकलेट सुन्या उर्फ सुनील किशोर डोकेफोडे या सराईतासह दोघांना गजाआड केले होते. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, एक सिंगल बोअर रायफल तसेच, तलवार जप्त करण्यात आली होती. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतर प्रथम पोलिसांच्या हाती लागला आहे.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like