तुम्ही चॉकलेटप्रेमी आहात का ? मग तुमच्यासाठी ‘धक्कादायक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चॉकलेट म्हटलं की सर्वांच्यांच तोंडाला पाणी सुटते. त्यातल्या त्यात जर चॉकलेट मिळालेच नाही तर.. काय होईल. हा विचारच नकोसा वाटतो. भारतात चॉकलेटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. तसंच भारतात चॉकलेट प्रेमीही अधिक आहेत. त्यामुळे या चॉकलेट प्रेमींसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे चॉकलेटच्या उत्पादनावर संकट आले आहे.

अमेरिकेच्या हवामान खात्याने एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार येत्या ४० वर्षांत चॉकलेटचे नामोनिशान मिटू शकते. आता तुम्ही म्हणाल वातावरण तापमान यांचा काय संबंध. तर यांच्या संबंध चॉकलेटच्या उत्पादनापासून आहे. चॉकलेटच्या उत्पादनासाठी २० अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान लागते. तसंच हे तापमान २० पेक्षा खालीच नियंत्रित असावा लागतो. पण सध्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा फटका या उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे.

जगातील घाना, इंडोनेशिया, ब्राझील, इक्वेडोर, कॅमेरून, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी या देशामध्येच चॉकलेटचं उत्पादन होतं. या देशांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच चॉकलेटचं उत्पादन केलं जाते. इथे तापमान जर २० डिग्रीच्या खाली असेल तरच नियंत्रित तापमानात हे उत्पादन होऊ शकतं. पण अमेरिकन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार जगात प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या भौगोलिक समीकरणांमुळे तापमान वाढत आहे. यामुळे येत्या ३० वर्षांत चॉकलेटचे उत्पादन करणाऱ्या देशांचे तापमान २.१अंशाने वाढू शकते.

दरम्यान, या अहवालानुसार पुढची १० वर्ष चॉकलेटचे उद्योग चालतील. पण जगातून पुढील ४० वर्षांत चॉकलेट नष्टच होऊ शकते. आणि आपल्याला चॉकलेट हवं असेल तर हे तापमानवाढीच संकट रोखणे अधिक गरजेचे आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

Loading...
You might also like