अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरू नका ! ‘हे’ सोपं काम करून मिळवा आराम

पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा फुप्फुसात योग्य प्रमाणात हवा पोचत नाही किंवा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम लागतो. अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणं हे जीवघेणंही ठरू शकतं. आज आपण दम लागण्याची लक्षणं आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यावर उपाय जाणून घेणार आहोत.

काय आहेत लक्षणं ?
जोरात खोकला येणं
श्वास घ्यायला त्रास होणं
बोलताना त्रास होणं
श्वास घेत असताना नाकातून आवाज येणं
त्वचा, ओठ निळे पडणं.
बेशुद्ध पडणं

जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि तुम्ही अस्वस्थ झाला असाल तर अशा वेळी त्वरीत डॉक्टरांसोबत संपर्क साधायला हवा. तरीही यासाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.

जर एखाद्या व्यक्तीला दम लागत असेल तर त्या व्यक्तीच्या मागे उभं राहून हातांनी कमरेला पकडा आणि पुढच्या बाजूला वाकवण्याचा प्रयत्न करा. एका हाताची मुठ करून नाभीवरच्या भागात ठेवा. हातांनी पोटावर दाब द्या. त्या व्यक्तीला वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया केली तर दम लागण्याची समस्या दूर होईल. ही क्रिया 5 वेळा करा.

श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गुडघ्यावर जमिनीवर बसा. संपूर्ण शरीर वाकवण्याचा प्रयत्न करा. हातांची मुठ तयार करून जमिनीला टेकवा. ज्याप्रमाणे पुशअप्सचा व्यायाम करताना शरीराची पोजिशन असते तशी करा. यानंतर आपल्या हातांना वर उचलत परत जमिनीवर आणा. यामुळं फुप्फुसांपर्यंत हवा पोचण्याचा मार्ग मोकळा होईल. अनेक प्रयत्न करूनही त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.