आरोग्यताज्या बातम्या

Cholesterol Control | कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे?; मग ‘हे’ 3 ड्रिंक्स घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Control | निरोगी आरोग्य राखण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणे आवश्यक असते. आहारावर अयोग्य परिणाम झाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. दरम्यान, हाय कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) पातळी नियंत्रणात राखण्यासाठी आहारामध्ये अनेक बदल करणे गरजेचे असते. उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी खाण्यापिण्यावरही लक्ष देणे आवश्यक असते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षात घेऊन नेहमी चांगले आणि शरीराला फायदेशीर पदार्थ खाल्ले जाणे महत्वाचे आहे. काही ड्रिंक्स (Cholesterol Control Drinks) आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी (Cholesterol Control) होईल, जाणून घ्या.

 

1. टोमॅटोचा ज्यूस (Tomato Juice) –
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन (Lycopene) शरीरातील लिपिड्सची पातळी वाढवतं आणि कोलेस्ट्रॉलमध्ये असलेल्या लिपोप्रोटीनची पातळी कमी करतं. एका संशोधनानुसार, ‘टोमॅटो उत्पादनांच्या उच्च वापरामुळे एथेरो प्रोटेक्टिव्ह (Atheroprotective) प्रभाव असतो, ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. (Cholesterol Control)

 

2. ओट मिल्क (Oat Milk) –
एका संशोधनानुसार, ओट मिल्क कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. ओट्स कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात मात्र त्यापेक्षाही ओट्सचे मिल्क अधिक प्रभावी असल्याचं आढळलं आहे.

3. ग्रीन-टी (Green Tea) –
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. एक कप ग्रीन टीमध्ये 50 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅटेचीन असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर ग्रीनटीचे सेवन फायदेशीर ठरेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol Control | 3 drinks can helps you to reduce high cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Intermittent Fasting Health Tips | वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटेंट फास्टिंग’चा पर्याय निवडावा का?; जाणून घ्या

 

Bathing With Salt Water | सांधेदुखीचा त्रास होत आहे का?; मग आंघोळीच्या पाण्यात ‘ही’ गोष्ट मिसळा होईल फायदा, जाणून घ्या

 

Ayurvedic Drinks | उन्हाळ्यातील रामबाण उपाय – आयुर्वेदिक ड्रिंक ! गॅस, थकवा, तोंडात फोड आणि डायरियामध्ये तात्काळ आराम देतील ‘हे’ हेल्दी ड्रिंक, जाणून घ्या कृती

Back to top button