Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Control | खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढण्यास कारणीभूत आहे. हिवाळ्यात, लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते (Winter Health Tips). उच्च रक्तदाबामुळे (High BP) खराब कोलेस्ट्रॉल रक्तात जमा होऊ लागते, ज्यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack), स्ट्रोकचा धोका वाढतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या (American College Of Cardiology) वार्षिक वैज्ञानिक परिसंवादानुसार, बदलत्या ऋतूंनुसार कोलेस्ट्रॉलच्या पातळीत लक्षणीय चढ-उतार होत असतो. (Cholesterol Control)

 

या शोधनिबंधानुसार, काही लोक ज्यांचे कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईनवर आहे, त्यांना हिवाळ्यात हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. यापूर्वी ब्राझीलच्या संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे हिवाळ्यात जास्त मृत्यू होतात. (Cholesterol Control)

 

ज्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचे (Triglycerides) प्रमाण जास्त असते त्यांनी हिवाळ्यात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी दिनचर्येत सुधारणा करून आहारात बदल करावा. आहारात बदल करून कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते. आहारात हेल्दी फॅट्स घेतल्याने कोलेस्ट्रॉल सहज कमी होते. हेल्दी फॅट्स असलेले कोणते पदार्थ आहेत जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात ते जाणून घेवूयात…

 

बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कसे कमी करावे

1. हिवाळ्यात मासे खा (Eat Fish In Winter) :
हिवाळा येताच माशांचे, विशेषतः ऑयली फिशचे सेवन वाढवा. ऑयली फिशमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल किंवा हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता असते. सॅल्मन, टूना फिश खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

 

2. कडधान्य खा (Eat Pulses) :
हिवाळ्यात मोड आलेले कडधान्य खा. हरभरा, मूग, ब्राऊन राईस इत्यादी रात्री भिजवून ठेवावे आणि सकाळी ते कोशिंबिरीत मिसळून सेवन करावे. सॅलड खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

3. बियांचे सेवन करा :
हिवाळ्यात बदाम, चिया सीड्स, नाचणी, जवस, ज्वारी, बाजरी इत्यादी सेवन करा. हेल्दी फॅटवाले या बिया कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.

 

4. हेल्दी फॅटसाठी अक्रोड खा (Eat Walnuts For Healthy Fats):
हेल्दी फॅट शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हेल्दी फॅटने समृद्ध अक्रोडमध्ये मल्टी-व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहते. याचे नियमित सेवन केल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो.

 

5. हिरव्या पालेभाज्या खा (Eat Green Leafy Vegetables) :
हिवाळ्यात हंगामी भाज्या खा. पालक, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो इत्यादी बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

 

या गोष्टी टाळा :
हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर दारू आणि सिगारेटचे सेवन बंद करा. रोज व्यायाम करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol Control | consume these 5 healthy foods to reduce bad cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

Devendra Fadnavis | शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, – गृहमंत्र्यांनी दिले आदेश