Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Control Diet | शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) म्हणजे LDL आणि चांगले कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणजे HDL. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएल रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून जाण्यापासून रोखते आणि या प्रक्रियेत अडथळा आणते. त्यामुळे स्ट्रोक (Stroke) आणि हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. तर त्याच वेळी, एचडीएल शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते (Cholesterol Control Diet).

 

म्हणूनच तुमच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, ज्या तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया (Cholesterol Control Diet).

 

1. सुकमेवा (Nuts) :
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सुक्यामेव्याचा समावेश करू शकता (Nuts to lower cholesterol). यासाठी तुम्ही अक्रोड, बदाम, शेंगदाणे (Walnut, Almond, Peanut) यांसारख्या नटचे सेवन करू शकता (Cholesterol Control Diet).

 

2. फळे (Fruits) :
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फळांचे सेवन देखील करू शकता. यासाठी सफरचंद, स्ट्रॉबेरी, द्राक्षे (Apple, Strawberry, Grapes) या फळांचा आहारात समावेश करू शकता.

 

3. सोयाबीन (Soybean) :
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही सोयाबीन खूप मदत करते. यासाठी सोयाबीनच्या बियांसोबत टोफू किंवा सोया मिल्क (Tofu or Soya Milk) सारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

4. ओट्स (Oats) :
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ओट्स देखील चांगली भूमिका बजावतात. त्यामुळे तुमच्या आहारात ओट्सचा समावेश करणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल.

 

5. शेंगा (Legume) :
तुम्ही तुमच्या आहारात बीन्सचाही समावेश करू शकता. शेंगांमध्ये प्रोटीन (Protein) आणि विद्राव्य फायबर (Soluble Fiber) भरपूर प्रमाणात असते.
जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Cholesterol Control Diet | 5 foods in diet to control cholesterol level

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss With Eggs | अंड्यासोबत ‘या’ 3 गोष्टींचे कॉम्बिनेशन वेगाने कमी करते वजन, स्वस्त-सोप्या टिप्स

 

Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !

 

Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा