Cholesterol | रोज सकाळी उठून खा हे फळ, शरीरात साठलेले कोलेस्ट्रॉल ताबडतोब होईल दूर, हृदय राहील निरोगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोलेस्टेरॉल (Cholesterol) आपल्या रक्तात असलेला मेणासारखा पदार्थ आहे, जो पेशी आणि हार्मोन्स तयार होण्यास मदत करतो. कोलेस्टेरॉलची सामान्य पातळी २००mg/dL पेक्षा कमी असते. जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि ब्लड फ्लोवर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. (Cholesterol) कोलेस्टेरॉलची समस्या सातत्याने वाढत असून सर्व वयोगटातील लोक हाय कोलेस्टेरॉलचे बळी ठरत आहेत. कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. घरबसल्या या समस्येवर सहज नियंत्रण ठेवू शकता. यासाठी कोणत्या फळाचे सेवन करावे ते जाणून घेऊया (Apples May Reduce Cholesterol).

 

दररोज २ सफरचंद खाल्ल्याने होईल चमत्कार!
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज २ सफरचंद (Apple) खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रोलची पातळी ४०% कमी केली जाऊ शकते. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका देखील लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. संशोधकांच्या मते सफरचंद खाल्ल्याने रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि ब्लड फ्लो सुधारतो. विशेष म्हणजे वृद्ध लोकांनी रोज एक सफरचंद खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. हे संशोधन इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांनी २०१९ मध्ये केले होते.

सफरचंद कसे कमी करते कोलेस्ट्रॉल?
संशोधकांच्या मते, सफरचंदात पॉलिफेनॉल आणि फायबरचे प्रमाण चांगले असते,
ज्यामुळे शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल निघून जाते आणि रक्त प्रवाह चांगला होतो.
फायबर आपल्या शरीरात पोहोचते आणि फॅटी अ‍ॅसिड तयार करते, ज्यामुळे लिव्हरमध्ये तयार होणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित होते.
शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल सफरचंदातील पोषक तत्व काढून टाकते आणि रक्तवाहिन्यांचे काम सोपे होते.
यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

 

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे इतर मार्ग
– दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
– मांसाहाराचे प्रमाण कमीत कमी ठेवा.
– डाएटमध्ये भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
– जीवनशैली निरोगी ठेवा.
– वेळोवेळी तपासणी करा.

Web Title :- Cholesterol | Wake up every morning and eat this fruit, the cholesterol stored in the body will be removed immediately, the heart will remain healthy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Metro | ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेत ३६ महिन्यांचा विलंब; ‘तरीही कंत्राटदाराला ३६ लाखांचाच दंड मात्र…’

Pune Crime News | खुनाच्या तयारीत असलेल्या कोयता गँगला गुन्हे शाखेकडून अटक, कुऱ्हाड, कोयता, गुप्ती, तलवार जप्त

Yavatmal ACB Trap | दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना नगरसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात