‘या’ कारणामुळं सेलेब्सवर पुन्हा एकदा ‘भडकली’ ‘कोरियोग्राफर’ फराह खान ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –फिल्म डायरेक्टर आणि कोरियोग्राफर फराह खान सेलेब्सवर पुन्हा एकदा भडकली आहे. यावेळी तिनं तिच्या पहिल्या व्हिडीओबद्दल माफी मागितली आहे. यानंतर तिनं स्टार्सला पुन्हा एकदा सल्ला दिला आहे की, त्यांनी प्रीवलेज्ड व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करणं बंद करावं.

फराह खाननं अलीकडेच राजीव मसंद मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “मी ज्या व्हिडीओत म्हटले होते की वर्कआऊट व्हिडीओ पोस्ट करून नका त्याबद्दल मी माफी मागते. सर्वांनी आपापली काळजी घ्या. मीही माझ्या बाल्कनीत एक तास चालत असते. त्यावेळी मी थोडी परेशान होते हे सगळं पाहून. परंतु मला हे सांगायचं आहे की, मित्रांनो हा ग्लोबली पार्टी टाईम नाहीये.”

पुढे बोलताना फराह म्हणाली, “इंडस्ट्रीत असल्यानं आपली इमेज आधीच खराब आहे. अनेकांनी पुढे येऊन मदत करत योगदान दिलं आहे. त्यावेळी सर्वांचा फोकस यावर होता की, मला पहा मला पहा. यापेक्षा आपण यावर लक्ष द्यायला हवं होतं की, आसपासच्या लोकांची मदत करावी. पहावं की, आसपासच्या लोकांना काही अडचणी तर नाही ना.” असंही फराह खान यावेळी बोलताना म्हणाली.