गणेश आचार्यवर महिला कोरियोग्राफरचा आरोप, म्हणाली – ‘माझ्यावर अश्लील व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य अडचणीत सापडले आहेत. 33 वर्षीय महिलेने त्यांच्याविरूद्ध अंबोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश तिला अ‍ॅडल्ट व्हिडिओ पाहण्यास भाग पाडत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्याचबरोबर तिला चित्रपटसृष्टीत काम करण्यापासून वंचित ठेवत असे आणि तिच्या इनकममधून कमिशनची मागणी करण्याचा आरोप देखील महिलेने केला आहे.

या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘जेव्हापासून गणेश भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन नृत्य दिग्दर्शक संघटनेचे सरचिटणीस झाले, तेव्हापासून ते मला त्रास देत आहे. जेव्हा मी गणेशचे म्हणणे ऐकत नव्हते, तेव्हा गणेश यांनी मला त्यांच्या संघटनेतून काढून टाकले. या व्यतिरिक्त गणेश हे मला आपली असिस्टंट होण्यासाठी देखील फोर्स करत होते. पण मी नकार दिला कारण मला स्वतंत्रपणे काम करायचे होते.’

महिला पुढे म्हणाली, ‘जेव्हा जेव्हा मी कुठल्याही कामासाठी त्यांच्या ऑफिसला जात असे तेव्हा ते नेहमी अ‍ॅडल्ट व्हिडिओ पाहत असे. मला अ‍ॅटल्ड व्हिडिओ पाहण्यास सांगायचे. हे सर्व ऐकून मला खूप राग येत असे.’

यापूर्वीही गणेश वादात होते. त्यांनी ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अँड इव्हेंट्स डान्सर्स असोसिएशन (AIFTEDA) नावाची एक संघटना स्थापन केली होती. सीडीएला (सिने डान्सर्स असोसिएशन) याबद्दल चिंता त्यांना होती. सरोज खान या विषयावर उघडपणे बोलल्या होत्या. सरोज खान यांनी दावा केला होता की गणेशने नवीन संघटना स्थापन केली. सरोज खानने त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप देखील केला होता, तेव्हा गणेश आचार्य म्हणाले की, ” मी (AIFTEDA) उद्घाटनास मी उपस्थित होतो कारण डान्सर्सने मला बोलावले होते.”

फेसबुक पेज लाईक करा

You might also like