Prabhu Deva Wedding : 47 वर्षीय प्रभू देवानं दुसऱ्यांदा केलं लग्न ? समोर आली ‘ही’ माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि अ‍ॅक्टर प्रभू देवा (Prabhu Deva) गेल्या अनेक दिवसांपासून खासगी लाईफमुळं चर्चेत येतान दिसत आहे. तो पुन्हा एका लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे, असं गेल्या अनेक दिवसांपासून सांगितलं जात होतं. आता अशी माहिती समोर आली आहे की, प्रभूनं सप्टेंबर महिन्यातच दुसरं लग्न केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभूनं गुपचूप पद्धतीनं बिहार बेस्ड फिजियाे थेरेपीस्टसोबत मुंबईत लग्न केलं आहे.

2 महिन्यांपूर्वीच केलं लग्न ?

एका इंग्रजी वृत्तानुसार, प्रभू देवा आणि त्याची पत्नी सध्या चेन्नईत राहत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभू काही दिवसांपूर्वी आपल्या कमरेच्या परेशानीमुळं तिला भेटला होता. यानंतर दोघांनी एकमेकांना पसंत करत काही दिवस डेट केलं. या वर्षीच दोघांनी सप्टेंबरमध्ये लग्न केल्याचं बोललं जात आहे.

प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जात आहे.

1995 मध्ये केलं होतं पहिलं लग्न

प्रभू देवानं 1995 साली रामलत (Ramlath) सोबत पहिलं लग्न केलं होतं. रामलत इस्लाम धर्मीय होती. लग्नानंतर तिनं हिंदू धर्म स्वीकारला होता आणि तिनं तिचं नाव बदलून लता ठेवलं होतं.

प्रभू आणि लता यांना 3 मुलं आहेत. 2008 साली मोठा मुलगा विशाल याचं कॅन्सरमुळं निधन झालं होतं. नयनतारामुळं त्यांच्या नात्यात दरी आली आणि 2011 साली त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी लताला मिळाली. परंतु प्रभूला त्याच्या मुलांना भेटण्याचं स्वातंत्र्य आहे.

प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तो सलमान खानचा सिनेमा राधे डायरेक्ट करत आहे. याशिवाय तो तमिळ सिनेमा पोन मनिकावेल, युंग मुंग सुंग आणि बघीरा अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे.