Remo D’Souza Heart Attack : प्रसिद्ध ‘कोरियोग्राफर’ रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका ! रुग्णालयात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) ला हार्ट अटॅक आला आहे अशी माहिती समोर आली आहे. गंभीर परिस्थितीत त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्याची एंजिलोप्लास्टी झालेली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानं याबाबत माहिती देत पुष्टी केली आहे. रेमोला कधी कुठे आणि कसा हार्ट अटॅक आला याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रेमोच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर फालतू आणि एबीसीडी अशा सिनेमांसाठी त्याला ओळखलं जातं. तो डान्स अकॅडमी देखील चालवतो. रेमोनं डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा आणि स्टार प्लसवरील डान्स प्लस अशा डान्स शोचं जजिंगही केलं आहे. आपल्या उत्तम कोरियोग्राफीसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यात IIFA अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, स्टार डास्ट अवॉर्ड्स अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे.