‘बिग बॉस’ फेम सोनाली राऊतच्या ‘बोल्ड’ फोटोंचा पुन्हा एकदा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

पोलिसनामा ऑनलाईन – बिग बॉस 8 ची एक्स स्पर्धक, मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस सोनाली राऊत सध्या आपल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनाली सोशल मीडियावर आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी फेमस आहे. सोनाली सध्या सोशलवर आपल्या काही हटके फोटोंनी राडा घालताना दिसत आहे. सोनालीनं नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या फोटोत बोल्ड अवतार दाखवला आहे.

सोनालीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. वेगवेगळ्या फोटोंमध्ये सोनाली वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिनं प्रत्येक फोटोत तिच्या दिलखेच अदा दाखवल्या आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फोटोत तिनं हॉट बिकिनी घातली आहे. सर्वच फोटोत ती प्रचंड हॉट दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये पोज देताना तिचं हॉट क्लीव्हेज नेहमीप्रमाणे स्पष्ट दिसतंय. सोनालीचे हे फोटो सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहेत.

सोनालीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती एका रिटायर डीसीपींची मुलगी आहे. तिनं किंगफिशरच्या कॅलेंडरसाठीही शुट केलं होतं. स्विम सूटमध्ये सोनाली खूपच स्टनिंग दिसत होती. तिच्या फोटोंचीही खूप चर्चा झाली होती. सोनालीची लहान बहिण उज्ज्वला राऊत ही देखील लाईमलाईटमध्ये असते. तीदेखील व्यवसायानं सुपरमॉडेल आहे.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली आलेल्या हिमेश रेशमियाच्या द एक्सपोज या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. 2016 साली आलेल्या अॅडल्ट कॉमेडी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीमध्येही ती झळकली आहे. सोनाली किंगफिशरची कॅलेंडर गर्लही राहिली आहे. बॉस बाप ऑफ स्पेशल सर्व्हीस या वेब सीरीजमध्ये सोनाली दिसली आहे. तिनं अनेक मालिकेतही काम केलं आहे. सोनालीनं टीव्हीमध्ये कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि कॉमेडी क्लासेजमध्येही काम केलं आहे.