Chowk Marathi Movie | ‘चौक’ होणार 2 जून रोजी प्रदर्शित; देवेंद्र अरूण गायकवाड यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Chowk Marathi Movie | महाराष्ट्रातल्या चौकाचौकात ज्या चित्रपटाची चर्चा आहे, अशा चौक या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. काही तांत्रिक कारणांमुळे हा चित्रपट १९ मे ऐवजी, २ जूनला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २ जूनला प्रेक्षकांची प्रतिक्षा संपेल आणि हा चित्रपट प्रदर्शित होईल. (Chowk Marathi Movie)
‘चौक’ या मल्टिस्टारर चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि समाजातील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला शुभेच्छा देत, हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटातील गाणी, चपटीत संवाद आणि थिरकायला लावणारं संगीत यांमुळे चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे रिल्स, संवादांचे रिल्स तरूणाईच्या स्टेटसवर दिसत आहेत. (Chowk Marathi Movie)
‘चौक’मध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, अंजली जोगळेकर, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड अशी कलाकारमंडळी आहेत.
तर दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड (Devendra Arun Gaikwad) यांची विशेष भूमिका आहे.
अनुराधा प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि दिलीप (तात्या) लालासाहेब पाटील निर्मित ‘चौक’ हा चित्रपट २ जूनला महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होईल.
Web Title : Chowk Marathi Movie | ‘Chowk’ to release on June 2; Devendra Arun Gaikwad’s directorial debut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- MP Sanjay Raut | संजय राऊतांवर पुन्हा हक्कभंग प्रस्ताव येणार?, संजय शिरसाट यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
- Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय
- 16 MLAs Disqualification | जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागेल, नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया