Chowk Marathi Movie Trailer Release | हिंदुस्थानी भाऊंच्या हस्ते दणक्यात बहुचर्चित मल्टिस्टारर ‘चौक’चा ट्रेलर लॉन्च; देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ होणार 19 मे रोजी प्रदर्शित (Video)

पोलीसनामा ऑनलाइन – Chowk Marathi Movie Trailer Release | ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार…’ या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे, आणि आता ‘चौक’ चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताक्षणीच सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Chowk Marathi Movie Trailer Release)

 

सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’! या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळेल. वास्तववादी चित्रण आणि अगदी रोज आपल्या अजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि कानावर पडणारे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे, असे ट्रेलरवरून लक्षात येते. यासोबतच संगीतकार साई-पियुष यांचं उत्कंठावर्धक पार्श्वसंगीतावरून या चित्रपटाचे वास्तव लक्षात येते. चित्रपटाचा विषयच ‘चौक’ असल्याने यात अनेक आऊटडोअर लोकेशन्स दिसत आहेत, अगदी बारकाईने आणि सुंदर पद्धतीने या लोकेशन्सचा वापर करण्याता आला आहे, ट्रेलरमधील या गोष्टींमधून चित्रपटाची उच्च निर्मितीमूल्यं दिसून येत आहेत. (Chowk Marathi Movie Trailer Release)

‘चौक’च्या या झंझावाती ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक आणि भूमिका, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे या नव्या पिढीतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय, स्नेहल तरडेंमधील संवेदनशील स्त्री, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाची पकड, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड हिचा कौतुकास्पद अभिनय, याशिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची चित्रपटातील विशेष भूमिका या सगळ्याचाच चित्रपटावर खोलवर परिणाम झालेला दिसतो.

 

चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थित दणक्यात पार पडला. यावेळी चौक चित्रपटातील कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’मध्ये वेलकम करणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं. हिंदुस्थानी भाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपटाचे निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आले.
‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे.’
असं मत हिंदुस्थानी भाऊने व्यक्त केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी किरण गायकवाडने डिजे होत सर्व पत्रकारांना आणि मान्यवरांना आपल्या संगीताच्या तालावर नाचवलं!

 

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून,
प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव,
हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती.
यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक १९ मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.


Web Title :- 
Chowk Marathi Movie Trailer Release | Hindustani brothers launch the trailer of the popular multi-starrer
‘Chowk’ with a bang; Directed by Devendra Gaikwad, ‘Chowk’ will release on May 19 (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – Ather Energy ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली 21 लाखाची फसवणूक

Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड

Devarshi Narad Awards | देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

SARTHI Pune | ‘सारथी’च्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी योगेश गडकरी