क्रिकेटर ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलनं शर्ट काढून केला ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिंधास्त क्रिकेटपटूंची यादी बनवली तर क्रिस गेल आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्व आणि बिंधास्त अंदाजामुळे नेहमीच टॉपवर राहील. फील्ड असो वा आऊट ऑफ फिल्ड त्याचा अंदाज कायमच निराळा असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यातही क्रिस गेलचा निराळा अंदाज पहायला मिळत आहे. 40 वर्षंचा क्रिस गेल एखाद्या प्रोफेशनल डान्सरप्रमाणे एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यानं नुकताच इंस्टाग्रामवरून त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत गेल शर्ट खोलून डान्स करताना दिसत आहे. गेलच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याला मूनवॉकर मायकल जॅक्सन म्हटलं आहे तर काहींनी त्याला सेक्सी म्हटलं आहे. युर्निव्हर्स बॉस म्हटला जाणारा गेल सध्या क्रिकेटपासून दूर आहे आणि आराम करत आहे.

विशेष बाब अशी की, वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर क्रिस गेलनं भारत दौऱ्याच्या आधीच स्वत:चं नाव संभाव्य यादीतून परत घेतलं होतं त्यानं म्हटलं होतं की, “वेस्ट इंडिजनं मला वन डे खेळण्यासाठी बोलावलं आहे. परंतु मी खेळू शकणार नाही. त्यांना (निवड करणाऱ्यांना) वाटतं की, मी तरुणांसोबत खेळावं परंतु यावर्षी मी आराम करणार आहे.” गेल ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्येही खेळणार नाही.

View this post on Instagram

😄

A post shared by KingGayle 👑 (@chrisgayle333) on

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like