क्रिकेटसाठी जगात सर्वात ‘सुरक्षित’ पाकिस्तान, क्रिस गेलनं सांगितलं ‘हे’ कारण

ढाका : वृत्तसंस्था – वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल यास विश्वास आहे की, सध्याच्या स्थितीत पाकिस्तान हे क्रिकेट खेळण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. गेल सध्या बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये चटगाव चॅलेंजर्ससाठी खेळत आहे. क्रिस गेलने येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. ते सांगतात की, जर तुम्हाला राष्ट्रपतींसारखी सुरक्षा मिळेल तर तुम्ही सुरक्षित हातात आहात. आम्ही बांग्लादेशातही पूर्णपणे सुरक्षित आहोत.

काही दिवसांपूर्वीच मागील दहा वर्षांत श्रीलंका पहिली अशी टीम ठरली आहे ज्या टीमने टेस्ट सीरीजसाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानमध्ये टेस्ट सीरीजदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष एहसान मानी यांनी म्हटले होते की, पाकिस्तान सुरक्षित आहे. मानी यांनी म्हटले की, आम्ही हे सिद्ध केले की पाकिस्तान सुरक्षित आहे, जर कोणी येथे येत नसेल तर त्यांना सिद्ध करावे लागेल की असुरक्षित का आहे. सध्याच्या स्थितीत पाकिस्तानच्या तुलनेत भारतात सुरक्षेचा प्रश्न जास्त गंभीर आहे.

ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये श्रीलंकेने यशस्वी दौरा केल्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने कोणालाही शंक असू नये. हे पाकिस्तानमध्ये टेस्ट क्रिकेट सुरू होण्यासाठी मोठे पाऊल आहे. संपूर्ण जगात पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्यात मीडिया आणि दर्शकांची मुख्य भूमिक असेल. आता, पीसीबीने बांग्लादेशला तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅचसाठी निमंत्रण दिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/