Live मॅच दरम्यान OUT झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या डोक्यात निघू लागला ‘धूर’, Video झाला व्हायरल (व्हिडीओ)

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगचा ( PSL 2020) जल्लोष सुरू आहे. या टूर्नामेंटमध्ये अनेक परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रत्येक टीम कप जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमला भिडत आहे, परंतु या टूर्नामेंटमध्ये काही गंमती-जमती सुद्धा घडत आहेत. लाहोर कलंदर आणि पेशावर जाल्मीत मॅचमध्ये अशी घटना घडली, जेव्हा क्रिस लिनच्या डोक्यातून धूर निघू लागला. सोशल मीडियावर क्रिस लिनच्या डोक्यातून धुर निघणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि फॅन्सनी गमतीदार कमेंटसुद्धा केल्या.

पीएसएलच्या एका मॅचमध्ये कलंदरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला 12-12 ओवर खेळायच्या होत्या. जाल्मीने चांगली सुरूवात केली. कामरान अकमलने आउट होण्यापूर्वी 32 रण ठोकल्या. डावखुरा फलंदाज शाहीनने अफरीदीच्या एका चेंडू षटकार लगावण्याचा प्रयत्न केला आणि तो सोहेल अख्तरच्या हातून झेलबाद झाला.

नंतर हैदर अलीने 12 चेंडूमध्ये 34 धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि एक षटकार होता. दुसरीकडे टॉम बॅटनने 15 बॉलमध्ये 34 धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकार होते. जल्मीने 12 मध्ये 132 धावा केल्या. यादरम्यान एक घटना घडली, ज्याला प्रसिद्धी मिळाली. कॅमेर्‍याने क्रिसला टिपले, ज्याच्या डोक्यावर धूर निघत होता. फॅन्ससाठी गंमतीदार घटना होती.

क्रिस लिन गोलंदाजीमुळे नाराज होता. कलंदरने ही मॅच 16 धावांनी गमावली. त्याची टीम 12 ओवरमध्ये 6 विकेटवर 116 धावा बनवू शकली. लिनेने 15 बॉलमध्ये 30 आणि समित पटेलने 15 बॉलमध्ये 34 धावा बनवल्या.