Christine McVie | फ्लीटवूड ‘या’ प्रसिद्ध बँडच्या सदस्य गायिका, गीतकार क्रिस्टीन मॅकवी यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Christine McVie | हॉलिवूडमधून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बँड फ्लीटवूडच्या सदस्या गायिका आणि गीतकार क्रिस्टीन मॅकवी (Christine McVie) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

 

क्रिस्टीन यांचा जन्म 12 जुलै 1943 रोजी नॉर्थ वेस्ट इंग्लंडमध्ये झाला होता. 1970 मध्ये त्या फ्लीटवूड बँडमध्ये सामील झाल्या होत्या, तर ‘लिटिल लाइज’, ‘एवरीवेयर’, ‘डोंट स्टॉप’, ‘से यू लव मी’ आणि ‘सोंगबर्ड’ या चित्रपटांमुळे क्रिस्टीन यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तर त्यांच्या Rumors या अल्बमच्या ४० मिलियन पेक्षा अधिक कॉपीज विकल्या गेल्या होत्या. 1970 आणि 80 दशकात जगातील सर्वात प्रसिद्ध बँड म्हणून फ्लीटवूड बँडला ओळखले जात होते. क्रिस्टीन मॅकवी यांनी 1998 मध्ये हा बँड सोडला होता. मात्र, पुन्हा त्यांनी 2014 मध्ये या बँडमध्ये सहभाग नोंदवला होता.

 

क्रिस्टीन मॅकवी यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टीन या खूपच आजारी होत्या. “क्रिस्टीनला तुम्ही तुमच्या हृदयात ठेवावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या संगीताला जगभरातून नेहमीच प्रेम मिळत होते ते कायम तसेच राहावे”, अशा शब्दांत त्यांच्या कुटुंबांनी पोस्ट शेअर केली आहे.

तर ट्विटर वर फ्लीटवुड बँड च्या वतीने क्रिस्टीन मॅकवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की “आम्हाला क्रिस्टिन मॅकव्हीच्या निधनानंतर खूप दुःख झाले आहे
आणि आमच्यासाठी हे खूपच धक्कादायक गोष्ट आहे.
त्या खूपच टॅलेंटेड होत्या त्या उत्तम संगीतकार देखील होत्या. त्यांच्या जाण्याने आमच्या बँड मध्ये एक पोकळी
निर्माण झाली आहे. त्यांची आठवण आम्हाला कायमच येत राहणार”.

 

Web Title :- Christine McVie | fleetwood mac singer songwriter christine mcvie passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Pune Rickshaw Strike | रिक्षाचालकांच्या अडचणीत वाढ? रॅपिडोला अ‍ॅग्रिगेटर परवाना देण्यावर पुनर्विचार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे आरटीओला आदेश