Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chronic Kidney Disease | फ्रन्टियर्स इन मेडिसिनमध्ये (Frontiers In Medicine) नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, क्रोनिक किडनीच्या आजाराने (Chronic Kidney Disease) ग्रस्त, मध्यम किंवा शेवटचा टप्पा असलेल्या रुग्णांमध्ये एलोबिक्सिबेट (आयबीएटीचे प्रतिरोधक) बद्धकोष्ठता आणि लिपिड मेटाबॉलिज्म (Constipation and Lipid Metabolism) मध्ये सुधारणा करू शकते. क्रॉनिक किडनी रोग हा एक गंभीर आजार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

 

किडनीचे काम रक्त फिल्टर करणे हे असते आणि क्रोनिक किडनी आजार झाल्यास रक्त नीट फिल्टर होत नाही. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा व्यक्तीच्या शरीरात अनेक लक्षणे दिसू शकतात.

 

एखाद्या व्यक्तीला क्रोनिक किडनी डिसीज (Chronic Kidney Disease Symptoms) असल्यास त्याच्या शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात ते जाणून घेवूयात…

क्रोनिक किडनी डिसीजची लक्षणे (Symptoms Of Chronic Kidney Disease)

व्यक्तीच्या स्नायूंमध्ये पेटके (Cramps In Muscles) येणे हे क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण आहे.

उलट्यांसह शरीरात खाज सुटणे, पाय आणि घोट्याला सूज (Swelling Of Legs And Ankles) येणे ही किडनीच्या तीव्र आजाराची लक्षणे असू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल (Loss Of Appetite) किंवा जास्त लघवी होणे (Excessive Urination) किंवा न येण्यासारखी समस्या असेल तर ही देखील क्रोनिक किडनी डिसीजची लक्षणे असू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला झोपेचा त्रास (Difficult To Sleep) होत असेल, तर ही देखील क्रोनिक किडनी डिसीजची लक्षणे असू शकतात.

दुसरीकडे, गंभीर लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर, पोटदुखीसह पाठदुखी, तापाची समस्या, जुलाबाची समस्या, ताप, पुरळ उठणे, उलट्या होणे, उच्च रक्तदाब
(Back pain, Stomach Pain, Fever, Diarrhea, Rash, Vomiting, High Blood Pressure) इत्यादी लक्षणे क्रोनिक किडनी डिसीजच्या लक्षणांमध्ये गणली जातात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Chronic Kidney Disease | chronic kidney disease symptoms and signs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आजही पुन्हा वाढ ; जाणून घ्या आज काय आहे नवीन दर

 

Pune Crime | जमीन खरेदीचे पैसे देण्याच्या नावाने बोलावून केले अपहरण; उत्तर प्रदेशात नेऊन मागितली 10 लाखांची खंडणी

 

Pune Crime | भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत चोरट्याला अटक, 9 गंभीर गुन्ह्याची उकल