मद्यधुंद कार चालकानं तरुणींना उडवलं, एकीचा जागीच मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत मृत 20 वर्षीय तरुणीचं नाव अर्चना पार्टे आहे. भरधाव जाणाऱ्या चार चाकीनं तिला उडवलं. या चारचाकीमधील चारही तरूण मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. चालकानं रस्त्यावरून जाणाऱ्या 3 तरुणींच्या अंगावर गाडी घातली. यातील अर्चनाचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिकांनी दोघांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. चालकानं मात्र गाडी सोडून पळ काढला. या घटनेनंतर चुनाभट्टी पोलिस स्टेशनसमोर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलं आहे. काहीही चूक नसताना अर्चनाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर परिसरातुन हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

मृत तरुणचे नातेवाईक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेऊन शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तरुणीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like