‘गँगरेप’ प्रकरणात पीडीतेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गाजलेल्या मुंबई येथील चुन्नाभट्टी गँगरेप मधील पीडीतेच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी दीपक सुर्वे याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बहीणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील तपासाबद्दल माहिती मागण्यासाठी गेलेल्या भावाला सुर्वे याने जातीवाचक शिवीगाळ केली होती. तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीपक सुर्वे विरुद्ध चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुर्वे याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दीपक सुर्वे हा नेहरुनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी त्याच्याकडे चुनाभट्टी पोलीस ठाण्याचा अतिरीक्त भार सोपवण्यात आला होता. या प्रकरणातील तपासाबाबत माहिती घेण्यासीठी पीडीतेचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी दीपक सुर्वे याने पीडीतेच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून त्याला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच त्याला पोलीस ठाण्यातून हाकलून देण्यात आले.

चुन्नाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरूणीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला होता. आरोपींनी पीडीत तरुणीला ड्रग्जही दिले होते. तरुणीवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत असून पोलिसांकडे पुरावे असताना देखील पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –