home page top 1

निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचितचे ‘विचारमंथन’, कार्यकर्त्यांना ‘एकजुटीने’ काम करण्याचे आवाहन

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ विधानसभा निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांची तयारी करत आहेत. सोमवारी या विषयांवर वंचित आणि भारिप बहुजन महासंघ यांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. तसंच जिल्ह्यात तालुका आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौऱ्यांचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले. हे दौरे २५ जुलैपासून सुरु होणार आहेत.

झालेली बैठक भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामांचे अहवाल सादर करण्यात आले. तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन वानखडे यांनी यावेळी केले. या बैठकीला आमदार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी येत्या २५ जुलैपासून पक्षाच्या वतीने दौरे घेण्यात येणार आहेत. हे दौरे तालुका आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय असणार आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तयारीत पक्षाचे काम करताना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून काम न करता हातात-हात घालून एकजुटीने काम करावे, असं आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like