चतुःशृंगी देवी मंदिरात घटस्थापना, देवीला दीड किलो सोन्याचा मुकुट अर्पण

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी कुळाचाराप्रमाणे आणि देवीच्या देवळांमध्ये भक्तिपूर्वक घटस्थापना केली जाते. चतुःशृंगी देवीच्या मंदिरातही आज सकाळी ८ वाजता घटस्थापना करण्यात आली. सकाळी सहा वाजता अभिषेक, रूद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा करून महावस्त्र अर्पण करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c97427c7-cc9b-11e8-ba28-0733660b66e5′]

किरण मधुसूदन अनगळ या वर्षीचे सालकरी आहेत. नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. या वर्षी श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टने देवीसाठी तब्बल दीड किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. हा मुकुट राजाभाऊ वाईकर सराफ यांनी विनामूल्य तयार करून दिला आहे. अशी माहीती कार्यकारी विश्‍वस्त दीलीप अनगळ यांनी दिली.

[amazon_link asins=’B015KHN37E,B06WP5SXNM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dbf936e5-cc9b-11e8-9c93-f71b6499f178′]

पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदीरात बंदुकधारक सुरक्षा रक्षक अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरुंचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. महापालिकेतर्फे किटकनाशकांची फवारणी, कचरा उचण्यासाठी कंटेनर, पाणी शुध्दीकरण, अग्निशमन, रुग्णवाहिका अशी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

स्त्री हा समाजातील उपेक्षित घटक नाही हे देवीने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे, परंतु काही समाजकंटकांना हे मान्य होत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ कशी होऊ शकते ही त्यांची समस्या आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तिचा अनादर केला जातो, परंतु ही स्त्रीशक्ती जेव्हा अन्यायाने पेटून उठते तेव्हा ती महिषासुरासारख्या बलाढय़ राक्षसाचा संहार करते, त्याच्यावर विजय प्राप्त करते असे या सणाचे महात्म्य आहे.
या नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची पूजा आणि सप्तशतीचा पाठ याला विशेष महत्त्व आहे. स्त्रीशक्तीला दिलेला मान असे या सणाचे स्वरूप आहे. स्त्रीशक्तीबद्दल आदर व्यक्त करणे हे महत्त्वाचे कार्य या क्रतामागे आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीयांचा सन्मान हा महत्त्वाचा भाग आहे. स्त्रीला अबला समजून तिच्यावर अन्याय करणे, जबरदस्ती करणे, तिची मानहानी करणे, तिची विटंबना करणे ही प्रवृत्ती फारच बोकाळली आहे. तिला आळा घालण्याचे काम या उत्सवामुळे झाले तर हे क्रत फलद्रूप होऊ शकेल.