‘कोरोना’मुळं आता या लहान-लहान चूका नका करू, होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे मार्चपासून ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लोनचा ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट न केल्याने क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम झाला नाही. परंतु, आता सप्टेंबरपासून जर पेमेंटमध्ये बेपर्वाई झाली तर दंडासह क्रेडिट स्कोअरवर निगेटिव्ह परिणाम होणार आहे. कारण 31 ऑगस्टला मोरेटोरियमचा कालावधी संपला आहे.

पसंत पडलेली वस्तू बजेटच्या बाहेर असली तरी अनेकदा अशी वस्तू कॅश नसल्याने क्रेडिट कार्डने खरेदी केली जाते. परंतु, वेळेत क्रेडिट कार्डचे पेमेंट न भरल्याने व्याज भरावे लागते.

ईएमआय उशीराने भरणे, योग्य वेळी न भरणे, याचा प्रतिकुल परिणाम सिबिल स्कोअरवर होतो. लोनसाठी जास्त बँकांकडे ऑनलाईन चौकशी केल्याने सुद्धा सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी नेहमी वेळेवर ईएमआय आणि क्रेडिट कार्डचे बिल भरा. यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. अन्यथा स्कोअर खराब होतो, आणि कर्ज घेताना अडचणी येतात. उशीराने पेमेंट केल्याने दंड सुद्धा भरावा लागतो.

क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर कधीही करू नका. असे करण्याने क्रेडिट प्रोफाइल लाँग टर्म निगेटिव्ह होऊ शकते. अशा ग्राहकाला बँक क्रेडिट हंग्रीच्या कॅटगरीत टाकते. एकुण लिमिटच्या 40 टक्केचाच वापर करा.

एक ओळीत सांगायचे तर कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता वेळेत भरा. होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा वापरात बॅलन्स कायम ठेवा. एकाच प्रकारच्या क्रेडिटवर जास्त अवलंबून राहिल्याने तुमचा स्कोअर खराब होऊ शकतो.