CID | ‘रेखाचित्र’ कक्ष ! सीआयडी व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) वतीने सुरू करण्यात आलेल्या “रेखाचित्र” कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण Training पूर्ण झाले. 18 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. सीआयडी व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. CID Completed the training of the first batch of the sketch drawing class Certificate provided

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे Dr. Manikrao Salunkhe व
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी Atul Chandra Kulkarni यांच्या हस्ते आज मंगळवारी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक संभाजी कदम,
पोलीस उपअधिक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक अमोल गवळी, समन्वयक समीर धर्माधिकारी, भारती विद्यापीठाचे डॉ. के. डी. जाधव, डॉ. महादेव सगरे तसेच जे. जयकुमार,
हनुमंत मुळावडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुपमा पाटील, प्राचार्य डॉ. गिरीश चरवड
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Amit Lunkad News | प्रसिध्द बिल्डर अमित लुंकडची येरवडा कारागृहात रवानगी; उद्या पुन्हा कोर्टात….

यादरम्यान राज्याचे कृषी व सहकार मंत्री आणि भारती विद्यापीठाचे Bharati University कार्यवाह विश्वजित कदम यांच्या सूचनेनुसार सीआयडी व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
डॉ. गिरीश चरवड यांची या करारात निवड केली असून,
त्यानुसार रेखाचित्र काढून देण्यासाठी व प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत.

पोलीस दलात फरार तसेच संशयितांचे रेखाचित्र याला खूप महत्त्व आहे.
त्यावरून आरोपींचा माग तर काढला जातोच.
पण त्याची ओळख देखील पटविण्यासाठी मदत होते.
त्यामुळे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल यांनी सीआयडीत संशयित आरोपींचे रेखाचित्र काढण्याबाबत प्रशिक्षण कक्ष सुरू करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार भारती विद्यापीठकडून पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी याच्यासाठी रेखाचित्र प्रशिक्षण कक्ष स्थापन केला होता.
त्यानुसार पोलीस दलातील 18 पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
गेली 28 वर्षांपासून चरवड हे रेखाचित्र काढण्याचे काम करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : CID Completed the training of the first batch of the sketch drawing class Certificate provided

हे देखील वाचा

Pune Crime News | खुनाच्या गुन्हयात फरार असणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

रेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ