Cidco Home | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिडकोचा मोठा प्लॅन; तुमच्या हक्काचं घर पूर्ण होणार

Cidco Home | CIDCO's big plan on the occasion of Akshaya Tritiya; Your rightful house will be completed

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Cidco Home | अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे. याच मुहूर्तावर नवी मुंबईकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. सिडकोने अक्षय तृतीयेला नवीन गृहयोजना सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये विविध विभागातील शिल्लक घरांसह बारा हजार घरांचा समावेश असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सिडकोने अलिकडेच २६ हजार घरांची योजना राबविली होती. मात्र, या घरांना नवी मुंबईकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांची ओरड आहे. त्यामुळे केवळ १८ हजार ग्राहकांनीच या योजनेला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे याच योजनेतील सात हजार घरे अजून शिल्लक आहेत. यामधील सर्वाधिक घरे ही तळोजा नोडमध्ये आहेत.

सिडकोच्या मागील गृहनिर्माण योजनेतील अनेक घरे विविध कारणांमुळे विक्री न झालेल्या अवस्थेत पडून आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उर्वरित सर्व घरांसह १२,००० नवीन घरांची योजना जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सिडकोतील सूत्रांनी दिली. दरम्यान, सिडकोच्या घरांच्या किमती आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांत घरांची मागणी कमी आहे. तथापि, नवी मुंबईत पुन्हा एकदा योग्य घराचे स्वप्न साकार करण्याची चांगली संधी असेल. यावेळी, सिडको लवकरच घरांच्या किमती आणि इतर तपशील जाहीर करण्याची शक्यता आहे.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Attempt to kill security guard by hitting him in the head with an iron rod; Housekeeping contractor arrested, security guard in coma after fatal beating

Pune Crime News | सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला केली अटक, जीवघेण्या मारहाणीत सुरक्षा रक्षक कोमात