CIDCO Lottery 2023 | घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास बातमी; सिडकोची 5 हजार घरांसाठी लॉटरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CIDCO Lottery 2023 | मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की घर घेणे परवडत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक म्हाडा किंवा सिडकोने दिलेल्या घरांना पसंती देत आहेत. म्हाडा (Mhada) आणि सिडको (CIDCO Lottery 2023) हे नेहमीच परवडणारी घरे उपलब्ध करून देत असल्याने लोकांकडून त्यांना पसंती दिली जाते.

नवी मुंबईत (New Mumbai) घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता मोठी माहिती समोर आली आहे. सिडको लवकरच 5 हजार घरांसाठी लॉटरी (CIDCO Lottery 2023) काढणार आहे. नवी मुंबईत अनेक घरांची विक्री झालेली नाही, अशी बाब समोर आली आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. म्हाडातील अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) हे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर (Managing Director) आले आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही सोडत काढण्यात येणार आहे.

सिडको सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात घरे बांधत आहे. दि. 31 मे
या दिवशीच ही लॉटरी निघणार होती, मात्र त्याचवेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जीं (Dr. Mukherjee)
यांची बदली झाली. त्यानंतर डिग्गीकर व्यवस्थापकीय संचालक झाले.
आता त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की लगेच लॉटरी निघेल.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने ही लॉटरी निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच टप्प्यात या घरांची विक्री करण्याची नियोजन प्राधिकरणाने आखले आहे.
विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेमध्ये सर्व घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली या परिसराच्या
सिडकोच्या प्रकल्पातील (CIDCO Project) घरांचा आगामी लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे.

Advt.

Web Title :  CIDCO Lottery 2023 | cidco lottery 2023 lottery in taloja node area for houses from cidco in navi mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई करते पण ‘या’ प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा