Coronavirus : वैज्ञानिकांनी भारतात पसरणार्‍या ‘कोरोना’ व्हायरसच्या खास लक्षणांना ओळखलं

नवी दिल्ली : हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल्यूयर अ‍ॅण्ड मॉलीक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) च्या संशोधकांनी भारतातील संक्रमित लोकांमधील कोरोना व्हायरसमध्ये एक खास लक्षणाची ओळख पटवली आहे. त्यांनी त्यास क्लेड ए 3 आय ( उश्ररवश अ3ळ ) नाव दिले आहे. हे भारतात सिक्वेन्स केलेल्या जीनोमच्या 41 टक्के सॅम्पलमध्ये आढळले आहे.

सीसीएमबीने ट्विट केले की, भारतात सार्स कोव2 च्या प्रसाराच्या जीनोम अ‍ॅनालिसिसवरील ताज्या शोधांचे परिणाम सांगतात की, व्हायरसच्या समुहाचे एक खास क्लस्टर समोर आले आहे, ज्याच्याबाबत अद्याप माहिती नव्हती, परंतु भारतात याचे प्रमाण जास्त आहे. तेलंगाणा आणि तामिळनाडुमध्ये हे खुपच जास्त आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, संशोधकांचा अंदाज आहे की, फेब्रुवारी 2020 मध्ये प्रसाराच्या दरम्यान व्हायरसच्या या क्लस्टरची उत्पत्ती झाली असेल आणि तो भारतात पसरला गेला असेल. कोविड-19 व्हायरसच्या भारतातील सर्व जीनोम सॅम्पलमध्ये 41 टक्के हे आढळून आले आहे आणि संपूर्ण जगाबाबत बोलायचे तर 3.2 टक्के सॅम्पलमध्ये हे आढळले आहे.

सीसीएमबी, प्रयोगशाळेचे संशोधक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या अंतर्गत येते. सीसीएमबीचे संचालक आणि या अभ्यासाचे सहलेखक राकेश मिश्रा यांनी म्हटले की, तेलंगाना आणि तमिळनाडुचे बहुतांश सॅम्पल व्हायरसच्या या नव्या क्लस्टरशी म्हणजेच क्लेट ए3आयशी मिळते-जुळते दिसून आले आहे.

मिश्रा म्हणाले, बहुतांश सॅम्पल तेव्हाचे आहेत, जेव्हा भारतात प्रसाराला सुरूवात झाली होती. दिल्लीच्या काही सॅम्पलमध्ये थोडी समानता आहे, परंतु, महाराष्ट्र आणि गुजराच्या सॅम्पलमध्ये कोणतीही समानता नाही. येत्या काळात आखणी सॅम्पलची जीनोम सीक्वेंसिंग करण्यात यावी, ज्यातून या विषयात आणखी माहिती मिळू शकेल.