धक्कादायक ! तोंडात फुटली E-सिगारेट, तरुणाचे झाले ‘असे’ हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जास्तीत जास्त लोक नॉर्मल सिगारेट ओढतात. पण अलिकडे ई-सिगारेट ओढण्याकडेही अनेकांचा कल बघायला मिळतो. धुम्रपानामुळे कॅन्सर तसेच विविध आजारांचा धोका असतानादेखील लोकं सिगारेट किंवा धूम्रपान करण्याचे कमी करत नाहीत. भारतात दरवर्षी लाखो व्यक्ती या कॅन्सर तसेच तंबाकूसंबंधित आजाराने मृत्यू पावतात. मात्र तरीदेखील भारतात याचे सेवन कमी झालेलले नाही.

अमेरिकेत देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे, मात्र या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू तंबाकूने झाला नसून ई-सिगारेट मुळे झाला आहे. अमेरिकेत एक १७ वर्षांचा मुलगा ई-सिगारेट ओढत होता. अचानक त्यांच्या तोंडात ई-सिगारेट फुटली. यामुळे त्याचा जबडा फुटला आणि त्याचे सर्व दात तुटून तोंडाच्या बाहेर आले. या परिस्थितीमुळे त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागल्याने त्याला लगेच उटाह येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथील एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरु आहेत.

याविषयी बोलताना डॉ. केटी रसेल यांनी सीएनएनला सांगितले की, लोकांनी अशी उपकरणे घेण्याआधी पूर्ण तपासणी केली पाहिजे. आरोग्यासाठी हि उपकरणे घातक आहेत. यानंतर या उपचारादरम्यान पीडित तरुणाने मला लवकर बरं व्हायचं आहे असे सांगितले. त्यामुळे आता हा रुग्ण किती लवकर बरा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकारच्या घटना याआधी देखील झाल्या असून एका घटनेत व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या वस्तू वापरण्याआधी त्या व्यवस्थित पाहून घ्याव्यात किंवा शक्यतो त्यांचा वापर टाळावा.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज