Cinema halls and Multiplexes Reopen | राज्यात ‘या’ तारखेपासून उघडतील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स, ठाकरे सरकारने जारी केले एसओपी

मुंबई : Cinema halls and Multiplexes Reopen | ठाकरे सरकारने (Thackeray Government) 22 ऑक्टोबरला राज्यात चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स (Cinema halls and Multiplexes Reopen) उघडण्याच्या परवानगीची घोषणा केली होती. परंतु त्यासाठी एसओपी (SOP) जारी केले नव्हते. याचा कारणामुळे मागील अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीसंबंधीत व्यापारी वर्ग त्रस्त होता.

कारण एसओपीशिवाय चित्रपटगृह उघडता येणार नव्हती. परंतु 11 ऑक्टोबरला ही प्रतिक्षा संपली आणि महाराष्ट्र सरकारने अखेर एसओपी जारी केले आहे.

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर SOP म्हणजे सरकारद्वारे मानक संचालन प्रक्रिया. महाराष्ट्रात चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स उघडण्यासाठी अंतर्गत जी मागणी करण्यात आली आहे, ती ही आहे की, चित्रपट गृहांच्या आत सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेण्यात यावी, फेस मास्क घालणे अनिवार्य असावे आणि चित्रपटगृहाच्या आत सॅनिटायजरचा वापर सुद्धा झाला पाहिजे. यासोबत इतर अनेक निर्देशसुद्धा दिले गेले आहेत.

दाखवावे लागेल व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट

जर तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायचा असेल तर व्हॅक्सीन घेतलेली असावी. येथे प्रवेश करण्यापूर्वी व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट दाखवावे लागेल. ज्यांनी लस घेतलेले नाही ते सुद्धा जाऊ शकतात, पण त्यांना आपल्या आरोग्य सेतु अ‍ॅपवर स्वता सुरक्षित असल्याचे दाखवावे लागेल. शिवाय येथे तापमान सुद्धा तपासण्यात येईल.

50 टक्के ऑक्युपन्सीला परवानगी

चित्रपटगृहात सध्या 50 टक्के ऑक्युपेन्सीसह उघडण्याची परवानगी दिली आहे.
ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देण्यास सांगितले आहे.
ऑडिटोरियम डिसइन्फेक्ट करावे लागणार आहे.
चित्रपटगृह कर्मचार्‍यांनी दोन डोस घेणे बंधनकारक आहे.
तसेच चित्रपटगृहात खाद्यपदार्थ खाण्यास परवानगी नाही.

हे देखील वाचा

Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी

शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अ‍ॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Cinema halls and Multiplexes Reopen | cinema halls and multiplexes will reopen in maharashtra from october 22 the government has issued sop

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update