Coronavirus : 3 मे पर्यंत ‘या’ सर्व गोष्टी बंदच राहणार : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत संपुर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवुन देशातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि काही अटी व शर्तींवर काही ठिकाणीच्या उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 3 मे पर्यंत देशातील सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.

रेड झोन, कोरोना हॉटस्पॉट जिल्हे तसेच कंटेन्मेंट परिसरास 3 मे पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेचे नव्हे तर गृह मंत्रालयाने स्वतःचाच आदेश बदलत ई-कॉमर्स कंपन्यांना देखील गरजेचं नसलेल्या सामानाची विक्री करण्यास स्थगिती दिली आहे. कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्हयात तसेच परिसरात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तिथं देखील सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या जातात काय यावर देखील सरकारी विभागाचं लक्ष राहणार आहे.