ऑगस्टमध्ये उघडले जावु शकतात देशभरातील सिनेमा हॉल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले संकेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरस महामारीमुळं गेल्या 4 महिन्यांपासून सिनेमा हॉल बंद आहेत. अशात अनेक मोठे सिनेमे ओटीटीवर रिलीज होत आहेत. तर काही सिनेमे रिलीज होणार आहेत. सिनेमा हॉलच्या साहाय्यानं घर चालवणाऱ्यांसाठी देखील अडचण निर्माण होताना दिसत आहे. अशात आता माहिती व प्रसारण मंत्रालयानं गृह मंत्रालयाकडं ऑगस्ट पासून सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी शिफारस केली आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी सीआयआय मीडिया समिती सोबत शुक्रवारी बातचित केली. त्यांनी सांगितलं की, गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला हे यासंदर्भात अंतिम निर्णय देतील. खरे यांनी सांगितलं की त्यांनी 1 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्टच्या आसपास सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी शिफारस केली आहे. यात सोशल डिस्टंसिंगचे नियम आणि पहिल्या रांगेत अल्टरनेट सीट आणि दुसरी रांग रिकामी राहिल असा फॉर्म्युलाही देण्यात आला आहे.

सिनेमा हॉल सुरू करण्याचा फॉर्म्युला
खरे यांनी सांगितंल की, मंत्रालयानं 2 मीटर सोशल डिस्टेंसिंगच्या नियमासोबत सिनेमा हॉल सुरू करण्याची शिफारस केली आहे. सध्या ते या वरील प्रतिक्रियेची वाट पहात आहेत. या बैठकीला सिनेमा हॉल मालकांचीही उपस्थिती होती. त्यांचं म्हणणं होतं की, हा फॉर्म्युला अयोग्य आहे. अशानं ऑडीटोरियमची 25 टक्केच क्षमता राहिल. सिनेमा हॉल बंद असण्यापेक्षाही ही वाईट स्थिती आहे.

यांची होती बैठकीला उपस्थिती
या बैठकीला सोनी, मेडिसन, डिस्कवरी, अ‍ॅमेझॉन प्राईम, ट्विटर, बेनेट कॉलमैन अँड कंपनी लिमिटेड, स्टार प्लज, डिज्नी आणि सीआयआय मीडिया समितीचे कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.