बहिणीशी बोलणाऱ्या मुलाचा भावानं घेतला ‘बदला’, ‘ट्रॅप’मध्ये अडकवलं आणि पुढं झालं ‘असं’ काही

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या बहिणीशी आपलाच सहकारी बोलत आहे याचा राग मनात ठेवून कामगाराने सहकाऱ्याला 3 दिवस डांबून ठेवून 15 लाखांची खंडणी मागितली विशेष म्हणजे अगदी एखाद्या सिनेमाप्रमाणे ट्रॅप रचून कामगाराने सहकाऱ्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कामगाराने महिलेला फोनवरून बोलायला लावून मित्राला प्रेमाच्या जाळ्यात अडवण्याचा प्रयत्न केला होता. मोहम्मद शकील खान हा एका लेडीज चप्पल बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता.

भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे 5 फेब्रुवारी सायंकाळी देखील तो घरी न परतल्यामुळे अस्मा या त्याच्या पत्नीने नारपोली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी पत्नीच्या फोनवर शकील याने फोन करून आपल्याला डांबून ठेवले असल्याची माहिती देत 15 लाखांची मागणी केली. त्यानंतर पत्नीने तात्काळ पुन्हा पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी लगेच फोनच्या माहितीच्या आधारे अंबरनाथ येथील वस्सीउल्लाह सिताबुल्ला खान यास ताब्यात घेतलं. त्याने दिलेल्या माहितीनुसार शगिर चौधरी आणि त्याचे साथीदार यांनी अंबरनाथ येथील एक बंद गाळ्यात शटरला कुलूप लावून आतमध्ये मोहम्मद शकील यास हातपाय बांधून बंदी बनवून ठेवले असल्याचं समजलं पोलिसांनी लगेच कारवाई करत शकीलला सोडवले आणि यातील सर्व आरोपीना ताब्यात घेऊन आणि शगिर अब्दुल रहमान चौधरीला अटक केली.

असा रचला ट्रॅप
पोलिसांनी आरोपी म्हणून पकडलेला चौधरी आणि शकील हे आधी सोबत काम करत होते मात्र त्यावेळी चौधरीला शकील आपल्या बहिणीशी बोलत आहे असा संशय होता नंतर त्याने काम सोडले मात्र तो राग मनात असल्यामुळे त्याने शकीलला अद्दल घडवण्यासाठी ट्रॅप रचला ज्यानुसार तो शकील सोबत शमा या बनावट नावाने चॅट करत राहिला एवढेच नाही तर त्याला विश्वास बसावा म्हणून आपली मैत्रीण स्वाती माळी हिला शकीलशी भेटण्यास सांगितले. एके दिवशी भेटण्याच्या बहाण्याने सापळा रचून चौधरी यांनी शकीलला उचलले आणि शेटरमध्ये डांबून ठेवले.

एका महिलेसह पाच जणांना अटक, एक फरार
पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी या सर्व सापळ्याचा छडा लावला आणि डांबून ठेवलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले यामध्ये नारपोली पोलिसांनी शगीर अब्दुल रेहमान चौधरी , वसीम इसरार खान, अब्दुलकलाम अब्दुलसलाम खान, वसीउल्लाह सीताबुल्ला खान , आणि महिला स्वाती सीताराम माळी अशा पाच जणांना अटक केली असून सलमान हा आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरातील असून सध्या तो फरार आहे.