Covid-19 testing kit : बाजारात आजपासून मिळणार Cipla चं रियल टाइम कोरोना टेस्टिंग किट, जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फार्मा कंपनी सिप्लाचा रियल टाइम कोविड-19 टेस्टिंग किट आज म्हणजे मंगळवार (25 मे) पासून बाजारात मिळणार आहे. सिप्लाने या आरटी-पीसीआर टेस्ट किटचे नाव ’वीराजेन’ ठेवले आहे. फार्मास्युटिकल कंपनी सिप्लाने हा मागील आठवड्यात 20 मे 2021 ला लाँच केला होता. सिप्लाने म्हटले की, हा रियल-टाइम कोरोना व्हायरस (कोविड -19) टेस्टिंग किट मंगळवारपासून बाजारात मिळेल. सिप्लाने ’वीराजेन’ टेस्टिंग किटची यूबियो बायोटेक्नोलॉजी सिस्टम्ससोबत भागीदारीत निर्मिती केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, सिप्लाने लाँचच्या नंतर म्हटले होते की, हे टेस्टिंग किट देशात टेस्टिंग सर्व्हिसेस आणि कॅपेसिटीशी संबंधीत आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल. यासोबतच डायग्नोस्टिक स्पेसमध्ये कंपनीचा विस्तार सुद्धा होईल.

सिप्लाच्या रियल टाइम कोविड-19 टेस्टिंग किटला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने वापरास मंजूरी दिली आहे. यामध्ये मल्टीप्लेक्स पीसीआर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

बायोस्पेक्ट्रम जनरल वेबसाइटनुसार, हे मानक मंजूरी चाचणीच्या तुलनेत 98.6% ची संवेदनशीलता आणि 98.8% च्या वैशिष्ट्यासह सार्स कोव्ह-2एन जीन आणि ओआरएफ लॅब जीनचा शोध घेण्यात मदत करते.

सिप्लानुसार हे टेस्टिंग किट कोविड -19 च्या संशयीत व्यक्तीच्या वरच्या आणि खालच्या श्वसन नमून्यांमध्ये सार्स-कोव्ह-2 ने न्यूक्लिक अ‍ॅसिडच्या गुणात्मक शोध घेण्यासाठी डिझाइन केले आहे.

कोविड -19 च्या विरूद्ध लढाईत आपल्या कंपनीच्या योगदानाचे कौतूक करताना सिप्लाचे सीईओ उमंग वोहरा यांनी म्हटले की, यूबायो बायोटेक्नोलॉजी सिस्टम्ससोबत या फर्मच्या भागीदारीने त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. त्यांनी म्हटले, सिप्ला कोविड -19 च्या विरूद्धच्या या लढाईत अथक प्रयत्न करत आहे.