‘CISF’मध्ये 914 जागांवर ‘भरती’, ‘या’ उमेदवारांना ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण ही नोकरी थेट केंद्र सरकारमध्ये आहे. सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स CISF ने काँस्टेबल / ट्रेडमन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छूक, पात्र उमेदवार 23 सप्टेंबरपासून अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवार cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

या भरती अंतर्गत 914 जागा भरण्यात येणार आहे. ही भरती लेवल 3 मध्ये होईल. निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत प्रतिमाह वेतन मिळेल.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची तारीख – 22 ऑक्टोबर 2019

अंतिम तारीख – 29 ऑक्टोबर 2019

या पदांसाठी भरती –
काँस्‍टेबल आचारी – 350
काँस्‍टेबल मोची – 13
काँस्‍टेबल हज्‍जाम – 109
काँस्‍टेबल धोबी – 133
काँस्‍टेबल कारपेंटर – 14
काँस्‍टेबल स्‍वीपर – 270
काँस्‍टेबल पेंटर – 6
काँस्‍टेबल मॅसन – 5
काँस्‍टेबल प्‍लंमबर – 4
काँस्‍टेबल माळी – 4
काँस्‍टेबल इलेक्‍ट्र‍िश‍ियन – 3
काँस्‍टेबल कॉबलर – 1
काँस्‍टेबल बारबर – 2

पात्रता –
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून 10 पास. स्वीपर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10 वी बरोबरच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट ट्रेनिंग सर्टिफिकेट आवश्यक

वय –
या पदांसाठी 18 ते 23 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराच जन्म 2 ऑगस्ट 1996 च्या आधी 1 ऑगस्ट 2001 च्या नंतरचा नसावा.

निवड प्रक्रिया –
निवड प्रक्रियेत लेखी परिक्षा, PET/PST, डॉक्यूमेंटेशन आणि ट्रेड टेस्ट समावेश असेल. लेखी परिक्षा OMR वर आधारित असेल. ही परिक्षा हिंदी, इंग्रजी भाषेत देता येईल. लेखी परिक्षेचे आधारे किंवा ट्रेडच्या आधारे किंवा श्रेणीच्या आधारे लेखी परिक्षाचा रिझल्ट जाहीर करण्यात येईल.

परिक्षा शुल्क –
जनरल, ओबीसी, ईडब्युएस या उमेदवारांना 100 रुपये परिक्षा शुल्क असेल.
एसी, एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना परिक्षा शुल्क नसेल.